Thursday, September 19, 2024
HomeनाशिकKavita Raut : 'सावरपाडा एक्स्प्रेस' कविता राऊत सरकारी नोकरी मिळूनही नाराज; नेमकं...

Kavita Raut : ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत सरकारी नोकरी मिळूनही नाराज; नेमकं कारण काय?

राज्य सरकारकडून मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली होती नियुक्ती

नाशिक | Nashik

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या (State Government ) नोकरीसाठी डावलले जात आहे, अशी भावना माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने कविता राऊत यांच्या भावनेची दखल घेत त्यांना सरकारी नोकरी दिली. मात्र, कविता राऊत यांनी आता ही सरकारी नोकरी नाकारत याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा :  Nashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

कविता राऊत गेल्या ११ वर्षांपासून सरकारी नोकरीच्या (Government Jobs) प्रतीक्षेत होत्या. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, आपल्याला देण्यात आलेले पद एमपीएससीच्या (MPSC) संवर्गातून वगळलेली पोस्ट आहे. ज्युनिअर व बरोबरच्या खेळाडूंना चांगली पदे देऊन पदस्थापना केली. मात्र आपल्याला डावलण्यात आले. त्यामुळे सदर नियुक्ती मान्य नसून याविरोधात न्यायालयीन (Court) लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar : “मी झेड प्लस सुरक्षा घेईन, पण…”; शरद पवारांनी केंद्र सरकारला पत्र लिहित ठेवल्या ‘या’ अटी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू (International Runner) कविता राऊत यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच कविता राऊत यांना खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा उत्सव; मिरवणूक मार्गावर असणार ‘इतक्या’ सीसीटीव्हींची करडी नजर

उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे ही अपेक्षा

मला मिळालेली नियुक्ती ही २०१८ च्या जीआरनुसार आहे. मात्र, माझे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे असल्याने मला जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे, ही अपेक्षा आहे,असे कविता राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

माझा नोकरीचा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे मी जुन्या धोरणानुसार नियुक्ती मागितली होती. मात्र, मला नवीन धोरणानुसार नियुक्ती देण्यात आली. माझ्या बरोबरीचे ललिता बाबर, राहुल आवारे या खेळाडूंना विशेष न्याय देण्यात आला. मात्र, मला एकटीलाच वेगळा न्याय देण्यात आला आहे. मला आता जी नियुक्ती देण्यात आली आहे ती एक प्रशिक्षक म्हणून दिली आहे. त्यामुळे ही नियुक्ती मला मान्य नसून याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे.

कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या