Thursday, July 2, 2026
HomeनाशिकNashik News: मेन रोडवरील धोकादायक वाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Nashik News: मेन रोडवरील धोकादायक वाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

नाशिक | प्रतिनिधी
मेन रोड परिसरातील धुमाळ पॉईंट येथे आज बुधवारी (दि. 1) सकाळी साडेअकराच्या सुमारास धोकादायक स्थितीतील जुना वाडा कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वाडा पूर्वीच रिकामा करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तळमजल्यावरील दुकानांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

Raj Thackeray: फुटलेल्या खासदारांवर राज ठाकरेंचा बोचरा वार, म्हणाले देहविक्रीला तयार…

- Advertisement -

शहरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर हा वाडा कोसळला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. संबंधित वाडा महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होता. त्याबाबत मालकाला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे वाडा रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विनायक पांडे, नगरसेविका अदिती पांडे, ऋतुराज पांडे तसेच महापालिकेच्या अग्निशमन दल, बांधकाम विभाग आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून उर्वरित धोकादायक भाग पाडण्याची कारवाई प्रशासनाने हाती घेतली आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...