Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik News : मतदान यंत्रांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा; नाशकात पाच 'स्ट्राँगरुम'

Nashik News : मतदान यंत्रांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा; नाशकात पाच ‘स्ट्राँगरुम’

सहायक आयुक्त समन्वयक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मतदान (Voting) होणार असल्याने नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व आणि इगतपुरी या ५ मतदारसंघांतील मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी नाशिक महानगरात ‘स्ट्राँगरूम’ सज्ज होत आहे. या ठिकाणी सध्या स्थानिक पथकांचा बंदोबस्त तैनात असून आता सर्व ‘स्ट्राँगरूम’ सहायक पोलीस आयुक्तांसह सशस्त्र पोलिसांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेनंतर मतदान यंत्रे आत ठेवल्यावर तेथे सीआरपीएफ, एसआरपी व स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा नेमण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणारआहे. देवळाली मतदारसंघ (Deolali Constituency) वगळता नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व आणि इगतपुरीची ‘स्ट्राँगरूम’ नाशकात तयार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यासह परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या पथकांची हद्दीतील ‘स्ट्राँगरूम’ बाहेर गस्त सुरू आहेत. वाहतूक नियोजनाबाबत उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची पथके कामकाज करीत आहेत. पाचही स्ट्रॉगरूमसाठी सहायक आयुक्त दर्जाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

१८ नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी दोनस्तरीय सुरक्षा व्यवस्था (Security System) नेमण्यात येईल. २० नोव्हेंबर सायंकाळपासून सर्व ‘स्ट्राँगरूम ‘बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल. त्यात सीआरपीएफ, स्थानिक पोलीस, इंडो-तिबेट सीमा सुरक्षा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचा अतिरिक्त बंदोबस्त असेल. विशेष म्हणजे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही नेमण्यात आले आहेत. स्ट्रॉगरूमच्या सुरक्षेबाबत प्रत्येक तासाने नियंत्रण कक्षातून माहिती घेण्यात येत आहे. बंदोबस्ताच्या पाहणीसाठी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची ‘सप्राइज’ व्हिजिटही सुरू असल्याचे कळते.

हे देखील वाचा : Nashik Political : मतदार प्रा. फरांदे यांना मंत्रिपदी पोहोचवणार; माजी नगरसेवक संजय बागूल यांचा विश्वास

अशी आहे सुरक्षा

मतदारसंघांच्या स्ट्रॉगरूमसाठी पुढीलप्रमाणे पोलीस समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

नाशिक पूर्व : विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी पद्मजा बढे, एसीपी पंचवटी.
नाशिक मध्य : दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर – नितीन जाधव, एसीपी सरकारवाडा
नाशिक पश्चिम : छत्रपती संभाजी महाराज स्टेडिअम, अंबड शेखर देशमुख, एसीपी अंबड
इगतपुरी : शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस डॉ. सचिन बारी, एसीपी नाशिकरोड
देवळाली : अटल दिव्यांग भवन, मुंबई नाका (नामनिर्देशन) डॉ. सचिन बारी, एसीपी नाशिकरोड

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या