Thursday, May 7, 2026
HomeनाशिकNashik NMC News : स्थायीसाठी रणधुमाळी सुरू; सत्ताकेंद्रावर पकड मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग

Nashik NMC News : स्थायीसाठी रणधुमाळी सुरू; सत्ताकेंद्रावर पकड मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापौर व उपमहापौर निवड (Mayor and Deputy Mayor) झाल्यानंतर आता महापालिकेतील दुसरी सत्ता लढत स्थायी समितीसाठी रंगू लागली आहे. आर्थिक निर्णय, कर प्रस्ताव, विकासकामांचे नियंत्रण या साऱ्या अधिकारांची चावी स्थायी समितीकडे असल्याने १६ जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू झाली आहे.

- Advertisement -

महापौर निवडीनंतर लगेचच होणाऱ्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. मात्र, त्यावेळी हा प्रस्ताव तहकूब करून पुन्हा महासभा घेऊन नावे जाहीर करण्याचे ठरले होते. त्यामुळे पक्षांतर्गत लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क, गटनेत्यांकडे धाव यामुळे राजकीय (Political) वातावरण रंगत आहे. स्थायी समितीवर स्थान मिळणे म्हणजे आगामी वर्षभर शहरातील विकासाचा ‘डायरेक्टर बोर्ड’ मिळवण्यासारखे मानले जाते. त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच वरिष्ठांकडे आपली ‘फिल्डिंग’ लावली असून, काहींनी अंतर्गत गटबाजीही सुरू केली आहे.

हे देखील वाचा : Nashik MC News : स्वच्छ नाशिकसाठी महापालिकेची ‘ग्राउंड ॲक्शन’ मोहीम

महापालिकेतील (NMC) प्रत्येक मोठा खर्च, निविदा, रस्ते, जलप्रकल्प, अतिक्रमण कारवाईचे प्रस्ताव स्थायी समितीतूनच जात असल्याने येथे स्थान मिळवणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. महापौरपद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते, त्यानुसार भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी बिनविरोध निवड झाली आहे. तर आता स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोण बसणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. १६ सदस्य निवड झाल्यानंतर लगेचच सभापती निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला होणार आहे. त्यामुळे ही लढत केवळ सदस्यत्वापुरती मर्यादित राहणार नसून, पुढील सत्ता समीकरण ठरवणारी ठरणार आहे.

मनसेमुळे गणित बदलणार

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीसाठी एकूण १६ सदस्य निवडले जाणार आहेत. सध्या पक्षीय संख्येनुसार भाजपला १०, शिवसेना (शिंदे) ला ३, शिवसेना (उबाठा) ला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला १ जागा मिळण्याचा तौलनिक हिशेब आहे. शिंदे गटाची संख्या २६ असल्याने त्यांचा तौलनिक गुणोत्तर ३.४१ इतका आहे, त्यामुळे त्यांना केवळ तीन जागा मिळत आहेत. मात्र, मनसेच्या एका नगरसेविकेने शिवसेना (शिंदे) च्या शहर विकास आघाडीला साथ दिल्याने या गटाचे एकत्रित संख्याबळ २७ होते. त्यामुळे तौलनिक गुणोत्तर वाढून सुमारे ३.५४ होईल. उतरत्या क्रमाने उरलेल्या अपूर्णांकाच्या गणनेत या वाढीव गुणोत्तरामुळे शिंदे गटाला आता तीनऐवजी चार जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...