Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik NMC News : मनपा शाळांत 'वॉटर बेल'ची घंटा वाजणार! उन्हाच्या झळा...

Nashik NMC News : मनपा शाळांत ‘वॉटर बेल’ची घंटा वाजणार! उन्हाच्या झळा वाढल्यामुळे निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आता ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना नियमित अंतराने पाणी पिण्याची सवय लावण्यावर भर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik MHADA Fraud : बिल्डर लॉबीला दणका! माजी स्थायी समिती सभापतीसह बड्या असामींचे जामीन अर्ज फेटाळले

शिक्षण विभागाच्या (Education Department) प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण, थकवा, चक्कर येणे यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपक्रमानुसार शाळेच्या वेळेत दर दोन तासिकांनंतर घंटा वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित पाणी पिण्याची सवय लागून उष्माघातासारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना स्वतःही आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची पाण्याची बाटली शाळेत आणावी व वेळोवेळी पाणी प्यावे, यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मनपा शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे उन्हाळ्यात (Summer) विद्यार्थ्यांच्या आरोग्याची अधिक प्रभावी काळजी घेतली जाणार आहे.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ‘वॉटर बेल’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लागेल व उष्माघातासारख्या आजारांपासून त्यांचे संरक्षण होईल. सर्व शाळांनी या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करावी.

डॉ. मीता चौधरी

ताज्या बातम्या

लाडकी

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; मुदतीअखेर इतक्या...

0
मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ५४ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे....