नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विविध कारणांनी सतत पुढे ढकलत जाणाऱ्या नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC Election) सार्वत्रिक निवडणुकीला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आताच विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) होऊन राज्यात महायुतीची (Mahayuti) एकहाती सत्ता आल्याने लवकरच महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे इच्छुकांची तयारी पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण
१३ मार्च २०२२ रोजी नाशिक महापालिकेतील महापौरांसह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला तर नाशिक महापालिकेच्या इतिहासात १९९२ नंतर पहिल्यांदाच प्रशासक राजवट सुरू झाली आहे. अगोदर करोना (Corona) यानंतर ओबीसी आरक्षणामुळे नाशिक महापालिका निवडणूक रखडली आहे. २०१२ते २०१७ या मनपाच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेत १२२ नगरसेवक होते. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यात वाढ करून १३३ नगरसेवक संख्या केली होती. मात्र नंतर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने वाढवलेली सदस्य संख्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता
हे देखील वाचा : Maharashtra Politics : भाजपचा गटनेता निवडण्यासाठी निरीक्षक ठरले
दरम्यान, आता पुन्हा निवडणुकीची चाहुल लागल्याने इच्छुक तयारीला लागले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अनुभव आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेमुळे तरुण इच्छुक मतदारांशी (Voters) थेट संपर्क साधण्यावर भर देत आहेत. तर विधानसभा निवडणुकीचा निकालाचा महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार का, अशी चर्चा देखील रंगत आहे. तसेच प्रभाग रचना आणि मतदार यादीकडे इच्छुकांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? भुजबळांच्या वक्तव्याने संभ्रम वाढला
निकालाचा परिणाम होणार?
नाशिक मनपाच्या निवडणुकीवर विधानसभेच्या निकालाचा परिणाम होतो असे दिसून येते. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी नाशिक मध्य, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे २०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र निर्माण सेनेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. २०१७ पर्यंत मनपात मनसेनेची सत्ता होती. यानंतर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने कब्जा केला तर २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल ६६ नगरसेवक निवडून आले होते तर एक हाती सत्ता महापालिका २०२२ पर्यंत होती. यानंतर महापालिका निवडणूक झाली नाही तर नुकताच विधानसभा निवडणूक संपली असून त्यात पुन्हा भाजपच्या तिन्ही आमदारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.