नाशिक | Nashik
महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणुकीत २३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळविला आहे. यात भाजपला १३२, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) ४१ जागांवर विजय मिळाला आहे. या घवघवीत यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. पंरतु,निवडणुकीचा निकाल लागून तब्बल आठ दिवस होऊन गेले तरीही महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. भाजपच्या सर्वात जास्त जागा असल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदावर (CM Post) दावा सांगितला आहे.
हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण
दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडून देखील मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आली आहे. पंरतु, त्यांच्या या मागणीला भाजपकडून नकार देण्यात आला. यानंतर शिंदेंकडून गृहमंत्रीपदाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही देखील मागणी भाजपकडून नाकारण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असून त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : भाजपचा गटनेता निवडण्यासाठी निरीक्षक ठरले
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “शपथविधीसाठी मोठी तयारी करावी लागते, उद्या राज्यपालांना वाटलं तर ते ६ डिसेंबर रोजी देखील करू शकतात. त्यामुळे आता शपथविधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम असून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अजूनही झालेली नाही. तर दुसरीकडे मात्र येत्या ०५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर (ट्विट) दिली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
ते पुढे म्हणाले की,”महायुतीमध्ये गृहमंत्री पदावरून काहीही पेच नाही,त्याच्यावरून काहीही अडलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाहेर होते, एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते, त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला आहे. अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे, प्रत्येक खातं महत्वाचं आहे. गृह खातं जेवढे चांगले आहे तितकेच अडचणचे देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो, त्याचे देखील प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवॉर सुरू होता. काळी दिवाळी साजरी केली जात होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते. गृहमंत्रीपद म्हणजे काही सोपं काम नाही. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत चर्चा करून मार्ग काढू”, असे म्हटल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.