Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण करणे भोवले; सुरक्षा रक्षकांविरूद्ध गुन्हा...

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण करणे भोवले; सुरक्षा रक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं होतं?

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून (Security) कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि०१) रोजी घडली होती. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील एका भाविकाने या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. तसेच सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी (Trimbak Police) स्वत:हून दखल घेत पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी (Darshan) भाविकांची गर्दी उसळली होती. हरियाणा (Haryana) येथील एक भाविक दर्शनासाठी आला होता. काही कारणावरून सुरक्षारक्षक आणि त्यांच्यात वाद होऊन झटापट झाली. यावेळी त्याला मंदिरातील सुरक्षारक्षकांनी लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून आले होते. या घटनाक्रमामुळे मंदिरातील सुरक्षा रक्षकांची दादागिरी पुन्हा चर्चेत आली होती.

दरम्यान, या घटनेनंतर ज्या भाविकास मारहाण (Beating) झाली होती त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पोलीस शिपाई अमोल गोविंद बोराडे (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मंदिरातील सुरक्षारक्षक पप्पू नानाजी आचारी (रा.इंदिरानगर, त्र्यंबकेश्वर), तुकाराम उमेश बुरुंगे (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्यासह इतर ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश देवरे करीत आहे.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीबाबत विश्वस्तांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “त्याने ड्रग्ज…”

चौकशीचे देण्यात आले होते आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणार्‍या भाविकांना पाच ते सहा तास लागतात. दर्शनाची वेळ संपल्यावर चार ते पाच हजार भाविकांना दर्शन न घेता परतावे लागते. जे दर्शन रांगेत असतात, त्यांना सुरक्षा रक्षकांचा जाच सहन करावा लागतो. भाविकाला मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले होते.

घटनेनंतर विश्वस्तांनी काय स्पष्टीकरण दिले होते?

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले (Kilash Ghule) यांनी एका व्हिडीओद्वारे मारहाणीच्या घटनेवर स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकाला झालेली मारहाण ही वस्तू स्थितीला धरून नाही. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा भाविक हा पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला. यानंतर दर्शन बारीत तो साधारणता एक तास ध्यान साधनेसाठी बसला होता. मात्र, दर्शनासाठी गर्दी वाढल्यामुळे भाविकांना मंदिरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला उचलून दक्षिण बाजूच्या दर्शन बारीत बसवले. याच दक्षिण बाजूच्या दर्शन बारीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला. त्याने मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी कपड्यांवर जाण्याचा आग्रह धरला.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी जाण्याकरिता सोहळे नेसून जाण्याची परंपरा आहे. ती मोडून भाविकाने आत जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला गाभार्‍याच्या उंबर्‍यावरील एका सुरक्षा रक्षकाने हटकले. मात्र, त्याने जास्त उदिग्न होऊन सुरक्षा रक्षकालाच शिवीगाळ केली.यावेळी एका सुरक्षा रक्षकाच्या स्वेटरला त्याने गुंडाळले आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात सुरक्षा रक्षकाच्या डोळ्याला जखम झाली. यानंतर तो ओरडायला लागल्याने इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या भाविकाला उचलून मंदिराबाहेर काढले. या संपूर्ण प्रकरणानंतर सगळ्या विश्वस्तांनी त्या भाविकाला समज दिली. मात्र, यावेळी त्याने ड्रग्ज घेतल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो एका चांगल्या घरातील मुलगा होता, परंतु ड्रग्जच्या आहारी गेलेला होता, असे निदर्शनास आले. शेवटी त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि निघून गेला, असे घुलेंनी सांगितले होते.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...