Saturday, October 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Sinhastha Kumbha Mela 2026: सिंहस्थ कुंभपर्वाचा शंखनाद; नाशिक त्र्यंबकेश्वरला एकाच वेळी...

Nashik Sinhastha Kumbha Mela 2026: सिंहस्थ कुंभपर्वाचा शंखनाद; नाशिक त्र्यंबकेश्वरला एकाच वेळी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत भाविकांच्या अपार श्रद्धेचा आणि भक्तीचा महासंगम असलेला बहुप्रतीक्षित सिंहस्थ कुंभमेळा आजपासून अत्यंत उत्साहात सुरू होत आहे. गोदाकाठापासून ते त्र्यंबकेश्वराच्या कुंभनगरीपर्यंत संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या गजराने आणि धार्मिक बाताबरणाने दुमदुमून गेला असून भक्तीचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळत आहे.

कुंभपर्वाचा अधिकृत शंखनाद शनिवार, ३१ ऑक्टोवर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध केंद्रीय व राज्य मंत्री, आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

संपादकीय : ३१ ऑक्टोबर २०२६ – जनादेशाचा अन्वयार्थ की मित्रपक्षांतील दोषारोप?

ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येपासूनच कुंभनगरीत धार्मिक विधी, महापूजा, साधू-संतांचे आगमन आणि आखाड्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. रामकुंड, पंचवटी आणि साधूग्राम परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून देशभरातून येणाऱ्या साधु-महंतांची उपस्थिती वाढू लागली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, त्र्यंबकेश्वर आणि साधूग्राम परिसरात स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि भाविकांच्या निवासाची व्यवस्था अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कुंभनगरी पूर्णपणे सजली असून, पुढील काळात येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

ध्वजारोहण

त्र्यंबकेश्वर नगरी ध्वजारोहण सोहळ्यासाठी सज्ज; कुशावर्त कुंडावर दुपारी होणार ध्वजारोहण

0
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधीसिंहस्थ ध्वजारोहणाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुशावर्त कुंडावर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुशावर्त कुंड सज्ज...