Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! चाकणकरांनंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी 'या' महिल्या नेत्याची...

मोठी बातमी! चाकणकरांनंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ महिल्या नेत्याची वर्णी

मुंबई | Mumbai
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागलेल्या रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा ही राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे (NCP State Womens President Vaishali Nagwade) यांची वर्णी लागली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या म्हणून वैशाली नागवडे यांची ओळख आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे (Nikhil Thackeray) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली.

नो इन्श्युरन्स, नो फ्युएल! सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने देशभरात खळबळ

दादांची ‘कामाचा माणूस’ ही ओळख तळागाळात घेऊन जायचं
राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली. आज ते हवे होते, त्यांची कायम उणीव जाणवत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले. त्यामुळे आज जबाबदारी खुप वाढली आहे. दादांची ‘कामाचा माणूस’ ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायचं आहे. गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद, असे 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे. जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांनी दिली आहे.

कोण आहे वैशाली नागवडे?
मुळच्या दौंडच्या असलेल्या वैशाली नागवडे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत अजित पवारांनी यापूर्वी त्यांच्यावर ‘महानंदा दूध’च्या अध्यक्षपदाचीही महत्त्वाची धुरा सोपवली होती.
२००२ – २००५
संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
२००५-२०१६
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
२००७ – २०१२
सदस्य, पंचायत समिती, दौंड
२००९ – २०२९
अध्यक्ष, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस
२०१०
अध्यक्ष
पंचायत राज कमिटी, महाराष्ट्र राज्य
२०१३ – २०१६
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)

ताज्या बातम्या

Nashik Accident News : खासगी बसची दुचाकीला धडक; विवाहितेचा मृत्यू, रक्षाबंधन आटोपून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik माहेरचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करून पतीसोबत सासरी परतणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा रस्ते अपघातात मृत्यू (Road Accident Deth) झाल्याची...