Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane: सिंधुदुर्गातील मिनी विधानसभेवर महायुतीचा झेंडा; नितेश राणेंचा अपक्षांसोबत विरोधकांवर निशाणा,...

Nitesh Rane: सिंधुदुर्गातील मिनी विधानसभेवर महायुतीचा झेंडा; नितेश राणेंचा अपक्षांसोबत विरोधकांवर निशाणा, म्हणाले, अदृष्य हात…

सिंधुदुर्ग | Sindhudurga
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी) रोजी मतदान झाले. आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकताना दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजप उमेदवारांची विजयाकडे वाटचाल दिसून आली. पहिला निकालही भाजपच्या बाजूने आला. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये जिल्हा परिषदेच्या ५० पैकी ३० हून अधिक जागांवर भाजपा-शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोर अपक्षांमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या यशानंतरही भाजपाने नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपच्या उमेदवारांच्या विजयाने मत्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. राजेश जाधव यांच्या विजयाने कोकणात भाजपच्या विजयाला सुरुवात झाली. मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील भाजपच्या विजयी उमेदवारांचे पेढे भरवून अभिनंदन केले. दरम्यान, जिल्हा परिषदेत पाच अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करुन विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामध्ये अदृष्य हात असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केली.

- Advertisement -

सिंधुदुर्गाचा विकास अधिक ताकदीने करण्याची चांगली संधी-नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही महायुतीच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या. तसेच या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्ही सांधिक काम करू शकलो. सिंधुदुर्गाचा विकास अधिक ताकदीने करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आली आहे, असे नितेश राणे म्हणाले.

Sharad Pawar: शरद पवारांना खोकला, कफाचा त्रास; तातडीने पुण्याला रवाना, खासगी रुग्णालयात दाखल

भाजपला हरवण्याची ताकद ना शिवसेनेत ना काँग्रेसमध्ये
नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेले आहे. त्यांचा शब्द आता खरा करुन दाखवण्याचे काम महायुती करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. त्यावर मंत्री राणे म्हणाले की, या जिल्ह्यात महायुतीला हरवण्याची ताकद ठाकरे आणि काँग्रेसमध्ये नाही. येथे आता फक्त भाजप आणि शिवसेनेचाच भगवा फडकेल.

ZP Election Result: सोशल मीडियावर लोकप्रिय, पण निवडणुकीच्या मैदानात अपयश; माजी सरपंच निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव

जे अपक्ष उमेदवार निवडून आले त्यांचा उल्लेख भाजप बंडखोर असा करु शकता
यावेळी महायुती आणि भाजपाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबाबत नितेश राणे म्हणाले की, या निवडणुकीत जे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत, त्यांचा उल्लेख तुम्ही भाजपाचे बंडखोर असा करू शकता. या जिल्ह्यामध्ये भाजपा आणि महायुतीला पराभूत करण्याची ताकद ना उद्धव सेनेमध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये आहे. जर आम्हीच आमचं घर नीट व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो. मात्र काही अपक्ष उमेदवारांचा जो काही प्रकार झाला आहे. तो एका चांगल्या कामगिरीला गालबोट लावणारा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून जे काही अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वापर करून, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असं सांगून भाजपाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून निवडून आले आहेत. ही बाब ना रवींद्र चव्हाण यांना मान्य असेल ना आम्हा कुणालाच मान्य आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

हे गालबोट लावणारे लोकांचा हात वेगळा करण्याची वेळ
सिंधुदुर्गात पाच अपक्ष उमेदवार कमळ चिन्हाचा पराभव करुन विजयी झाले आहेत, त्यामुळे महायुतीच्या विजयाला गालोबोट लागले असल्याचे सांगत मंत्री नितेश राणे म्हणाले, हे गालबोट लावणारे लोक कोण आहेत. यांच्यामागे कोणाचा अदृष्य हात आहे. तो अदृष्य हात वेगळा करण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....