Wednesday, May 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Meeting: सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठकीत नेमकं काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने...

NCP Meeting: सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठकीत नेमकं काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (२६ मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूने उभे राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. आता यावरती राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार संजय बनसोडे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाकडून एसआयआर संबंधित महत्वचा निकाल; एसआयआर मोहिम वैध असल्याचा निर्वाळा

- Advertisement -

माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्या तथ्यहीन
आमदार संजय बनसोडे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. माध्यमांमध्ये बैठकीत वाद झाल्याच्या प्रसारित बातम्या पूर्णपणे निराधार व तथ्यहीन आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेलांवर होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक हवा मिळाली. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या गैरहजेरीनंतर नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच, छगन भुजबळांनी मात्र सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर रेंगाळला

0
पुणे | प्रतिनिधी Pune यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या सहा दिवस आधीच, म्हणजेच १६ मे रोजी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवास आता...