Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOmraje Nimbalkar: महिनाभरापूरापासून पक्षांतराचं प्लॅनिंग सुरु; ओमराजेंविरोधात घरातच बंडाचा झेंडा, भावाचा मोठा...

Omraje Nimbalkar: महिनाभरापूरापासून पक्षांतराचं प्लॅनिंग सुरु; ओमराजेंविरोधात घरातच बंडाचा झेंडा, भावाचा मोठा गौप्यस्फोट

धाराशिव | Dharashiv
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीमध्ये आलो असलो तरी माझा माझ्या जिल्ह्यात संघर्ष कायम राहणार आहे, असे धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली होताना दिसत आहे. ओमराजे निंबाळकर यांचे महिनाभरापासून बंडाचे प्लॅनिंग सुरू होते असा थेट दावा त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेंनी केला आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता घरातूनच विरोध झाल्याचे चित्र आहे.

दहा वर्षे एकत्र राजकारण करणारे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. एवढेच नाही तर पक्षाचा आदेश मिळाला तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरून बंड पुकारायला तयार असल्याचा इशारा मकरंदराजेंनी दिला आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली. मात्र मला निर्णय पटला नाही , त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजूनही सांगण्याचा प्रयत्न केला. २०२९ ला ही आपण सहज निवडून येऊ, असे सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही.

- Advertisement -

पडसाद : हिरेंची आणखी एक सत्ता खालसा

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू झाली असून संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ओमराजेंनी पक्ष सोडला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवच्या राजकारणात आता लढाई भावाविरुद्ध भाऊ अशी पहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...