बारामती | Baramati
बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीची पोटनिवडणुक जाहीर होताच जय पवारांनी बारामतीतील प्रत्येक गाव पिंजून काढले होते. त्यामुळे २०२९ मध्ये जय पवारांनी विधानसभा निवडणूक लढावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. यावर आता जय पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
२०२९ च्या निवडणुकीत जय पवार हे उमेदवार असतील का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. जय पवार आज सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदानासाठी आले असताना जय पवार यांना २०२९ च्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना जय पवार म्हणाले, “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे ते म्हणालेत”.
मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत रहावं
जय पवार यांनी सांगितले की, “माझी इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे”. माझी तयारी आहे की नाही यापेक्षा लोकांची ही इच्छा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
संपादकीय : २३ एप्रिल २०२६ – ‘पहलगाम’ वर्षपूर्तीनंतर..
रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील
मी एक सांगू इच्छितो यावेळेस दादांना अनेक वर्ष जसं प्रेम केलं, तसंच दादांना आणि वहिनींवर प्रेम करा. वहिनी भरघोस मतांनी निवडून येतील हीच आमची आशा आहे. सगळ्या बारामतीकरांनी मनावरती आजचा दिवस घेतला आहे, ही निवडणूक त्यांनी मनावर घेतली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टक्केवारी वाढवून मतदान होईल अशी आमच्या आशा आहे. 85 ते 90 टक्के पर्यंत मतदान होईल असा मला वाटते, कारण काल मी आमच्या सगळ्या पोलिंग एजंटला फोन लावला त्यांनी पण सांगितलं तसं आमचं काम चालू आहे. रेकॉर्ड ब्रेक मताने वहिनी निवडून येतील अशी आमची आशा आहे, किती मतांनी निवडून येतील या प्रश्नावर बोलताना जय पवार म्हणाले, त्याच्याबद्दल आता मी काही सांगू शकत नाही आपण चार तारखेला बघूयात.
रोहित सिंगला अटक झाली पाहिजे
“व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याला अटक झाली पाहिजे. अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती आमच्याकडून तपास यंत्रणांना करण्यात आली आहे. सीआयडीची टीम चांगले काम करत आहे. आम्ही तपास यंत्रणांच्या संपर्कात आहोत. अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की, ‘त्यांचे लक्ष आहे.’ दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जोपर्यंत मला खरी माहिती मिळत नाही, तोपर्यंत अजित पवारांचा अपघात की घातपात यावर बोलून लोकांची दिशाभूल करणे योग्य नाही. पुढील दोन ते तीन आठवड्यात अपघाताबाबत यंत्रणांकडून आपल्याला माहिती मिळेल, असं मला वाटते,” अशी प्रतिक्रिया जय पवारांनी दिली आहे.





