Wednesday, June 10, 2026
Home Blog Page 13374

शब्दगंध : आत्मशांती : स्वीकारातून आत्मशांतीकडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘आत्मशांती’ मनाशी व विचारांशी निगडीत आहे. पण त्याचा मनासह शरीराशी संबंध आहे. शरीर, मन सुदृढ व आनंदी असेल तर आत्मशांतीचा अनुभव चांगला येऊ शकतो. शरीर आणि मनामध्ये परस्पररीत्या एक प्रकारचा सलोखा आणि लय असणे गरजेचे असते. या समन्वयाच्या स्थितीतूनच आत्मशांती निर्माण होऊ शकते. तसेच आपल्या विचारांमधील तात्विकता व भावनिकता याचा समतोल असणे पण गरजेचे असते. आपल्या भोवतालची परिस्थिती, व्यक्ती व त्यांचा स्वीकार यातूनच हा प्रवास सोपा होऊ शकतो.

पल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध, काही पटणार्‍या तर काही ‘न’ पटणार्‍या, काही आवडणार्‍या तर काही न आवडणार्‍या. या सगळ्या अनुभवातून जेव्हा मन स्थिर राहते त्या स्थितीला आपण ‘आत्मशांती’ म्हणू शकतो. ही स्थिती अचानक येत नाही, तो एक प्रवास आहे. आत्मशांती हेच जर का ध्येय मानले तर त्याकडे जाणार्‍या वाटा अनेक आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतात. एखाद्याला काम करताना आत्मशांतीचा मार्ग सापडतो, तर एखाद्याला तो निसर्गात, संगीतात, स्वत:मध्येच सापडू शकतो.

आपले पंचेंद्रियांमधून देखील आपण विविध अनुभव घेत असतो. हे अनुभव जेव्हा आनंदाकडे जातात, आपल्याला शांत अनुभवात नेतात. आपल्या स्वत:कडे बघायलाही पंचेंद्रिय मदत करू शकतात. यातून निर्माण होणार्‍या जाणिवा मन व शरीराला दिशा देऊ शकतात.
माझ्या कामांतर्गत मी अनेक लोकांना भेटत असतो. बर्‍याच वेळा ते त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे आलेले असतात. त्यांच्या परिस्थितीतील कोलाहल, मनातील द्वंद मला जाणवत असते. अशावेळेस त्यांचे समाधान मी करू शकलो तर तो क्षण मलाही समाधान देणारा ठरतो. हीसुद्धा एकप्रकारची त्यावेळेला मिळालेली आत्मशांती असते.

जेव्हा मी सायकलिंग, स्वीमिंग, रनिंग करतो; ते करणे मी आनंदाने स्वीकारलेले असते. धावताना मी पूर्णपणे त्या धावण्यात रमलेलो असतो. माझे धावणे मी आणखी कसे सुधारू शकतो किंवा पोहोतांना माझे टेक्निक किती योग्य होऊ शकते याकडे माझे लक्ष असते. सायकलिंग करताना तर माझ्यात आणि सायकलमध्ये एक नाते जडते. या सगळ्या क्रिया करताना ते करण्यात हरवतो. ते हरवणे म्हणजेच आत्मशांती आहे, असे मला वाटते.

स्वत:ला स्थीर ठेवण्यामध्ये आत्मचिंतन, ध्यानधारणा व व्हिजुलायझेशन याचा चांगला उपयोग करता येतो. आपल्यालाा जी परिस्थिती हवी आहे त्यामध्ये विश्वास ठेऊन तिच्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकणे यातसुद्धा मोठी ताकद असते. रोजच्या जीवनात आपण सातत्याने कशान कशाचा शोध घेत असतो. काही ना काही गाठण्यासाठी धावत असतो. कुठल्या न कुठल्या प्रकारचा संघर्ष करत असतो. यातून कधी मन थकते तर कधी शरीर. अशा वेळेसच खरे तर आत्मशांतीचा शोध सुरू होतो. विविध मार्गातून ती सापडते. ती कधी क्षणिक असते तर कधी दीर्घकाळ टिकणारी असते.

परंतु आत्मशांती लाभली म्हणजे आपल्या विवंचना थांबतील, असे नाही, तर पुढे सरकणार्‍या आयुष्यामध्ये त्या परतही येतील. सकारात्मक आणि जिद्दीने सामोरे जाणे व त्यातून एक शांत परिस्थिती निर्माण करणे हे आपल्याला सातत्याने करावे लागेल. विवंचना व सुखशांतीचा हा प्रवास अनादी काळापासून सुरू आहे. तो पुढेही चालेलच. या प्रवासाला कोण कसे सामोरे जातो हेदेखील प्रत्येक जण आपल्यासाठी ठरवू शकतो.

पोलीस दलामध्ये काम करताना एक फोर्सचा अधिकारी असतो. हे काम करताना मी ऐकण्याची कला शिकलो. त्यातून मला लोकांना समजून घ्यायला मदत झाली. त्यांची मते वेगळी असली तरी त्यांचा आदर करायला शिकलो. यातूनच सापडला तो कॉमन गोलकडे जाण्याचा मार्ग. या कॉमन गोलमध्ये परस्परांचा आदर, विविध मतप्रवाहांचा स्वीकार, परिस्थितीकडे पाहण्याची सकारात्मकता व स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याची भूमिका घेणे आवश्यक असते. हे करताना एक मार्ग निवडावा लागतो आणि त्यावर विश्वासाने आणि खंंबीरपणे उभे राहावे लागते. स्वत:मधील द्वंद, एकाच वेळेला येणारे अनेक विचार हे काही नीतिमूल्य डोळ्यासमोर ठेऊन हाताळावे लागतात.

मला या सगळ्या आत्मशांतीच्या प्रवासात नेहमी मदत होते ती स्वसंभाषणाची. आपण स्वत:शी बोलले पाहिजे, मनामध्ये येणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जेव्हा स्वत:शी संभाषण साधतो तेव्हा विविध पैलू तपासून बघतो. एकतर्फी विचारांपासून दूर जाऊन सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विचार करण्याची सवय लागते आणि यातूनच समाधान देणारे उत्तर मिळू शकते. एका अर्थाने हाच प्रवास महत्त्वाचा असतो.

आत्मशांतीच्या या प्रवासात इतरांबद्दलचे पूर्वग्रह, मतसुद्धा वेळोवेळी तपासावे लागतात. आपले कुटुंबीय, आप्तजन, मित्र परिवार आणि ज्यांच्या बरोबर काम करतो ते सहकारी या सर्वांचा स्वीकार ते आहे तसाच करावा लागतो. कधी त्यांना समजून घ्यावे लागते, कधी समजून सांगावे लागते. आत्मशांतीच्या या प्रवासात आपल्या भोवतालची माणसे महत्त्वाची ठरतात व त्यांचा स्वीकार आपण कसा करतो यावर आपली मानसिक स्थिती अवलंबून असते. या बाबतीत मला गालिबचा शेर आठवतो, किंबहुना या वाक्यांनी खूप मदत होते.

‘कुछ इस तरह मैने जिंदगी को आसान कर लिया,
किसी से मांग ली माफी, किसी को माफ कर दिया…’

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल,
विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र

पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा विषयावर एकात्मिक अभ्यासक्रम; पुढील वर्षी होणार सुरुवात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर पाच वर्षे मुदतीचा एकात्मिक अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षीपासून सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासह विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही (यूजीसी) मान्यता मिळाली आहे.

या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रियाही राबवली जाणार आहे. संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयात उपलब्ध असलेले बहुतांश अभ्यासक्रम हे पदवी, पदव्युत्तर किंवा प्रमाणपत्र प्रकारातील आहेत. मात्र, विद्यापीठाने पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा पहिला मान मिळविला आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. संरक्षणशास्त्र विषयातील राज्यभरातील तज्ज्ञांसह देशभरातील तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू राहणार आहे. ‘पदवी आणि पदव्युतर पदवी मिळून एकूण दहा सत्रांचा हा अभ्यासक्रम आहे. बारावीत कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या विद्यार्थ्यांला एम. ए. आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला एम. एस्सी पदवी मिळेल. या अभ्यासक्रमातून संरक्षण क्षेत्रासाठी सक्षम थिंक टँक तयार करण्याचा उद्देश आहे. येत्या काळात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण होईल.

हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांतील प्रशासकीय जागा, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते. भारतात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अनुदान देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्टये*
*इंग्रजी भाषा
*स्थानिक ते जागतिक पातळीवरील संरक्षण आणि सामरिकशास्त्र संकल्पना
* संरक्षण क्षेत्राशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान
* विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा
* संरक्षण आणि सामरिकशास्त्राचे विविध पैलू
* पररराष्ट्र धोरण
* राष्ट्रीय संरक्षण संस्था
* सायबर सुरक्षा
* देशांतर्गत सुरक्षा
* क्षेत्रभेटी

Eco-park to be developed along both sides of Godavari

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

Godavari river which is known as southern Ganga river has been included in the central government’s Namami Gange project. Under this project, the eco-park will be developed along both sides of the Godavari river. In addition, various eco-friendly projects will be undertaken.

For this, Nashik Municipal Corporation (NMC) has been instructed to table a special action report till December 20. Fund of Rs 50 to 100 crore is likely to be received for this project. The central government has undertaken Namami Gange project to revive 9 principal rivers in the country.

Godavari river which is originated from here has now been included in this project. The central government has taken this decision considering pollution issue in Godavari river and instructions by Mumbai High Court to state government and NMC to take measures for this.

The High Court has formed a high-level committee to curb pollution and measures are being taken through this s per directives by the agencies. Maharashtra Pollution Control Board is taking various measures to deal with pollution. In addition, the smart city company will soon undertake Goda project for beautification of Godavari river.

The capacity of sewage treatment plants is also being increased to process sewage water in the city and action plan regarding this has been sent to the Centre. In addition, NMC has sought aid from the Centre for the cleanliness of Godavari river.

The central government has given its nod to provide aid to make Godavari pollution-free under the Namami Gange project and instructed to table the plan till December 20. A responsibility to prepare this new project plan has been given to NMC garden department chief and deputy municipal commissioner Shivaji Amle.

Accordingly, officials of the garden department are working to prepare the plan. Some eco-friendly projects will be conducted along both banks of Godavari in the 5-km distance from Someshwar to Ahilyabai Holkar bridge. Trees will be planted to stop soil erosion and other measures will also be taken as well.

It will be proposed to construct eco-park and gabion wall to for this. In effect, the Godavari river will be flowing all time, claiming the NMC garden department.

Rs 100 cr plan by NMC

On the lines of central government Namami Gange project, NMC is preparing a plan having the development of the eco-park, construction of gabion wall and other things for the cleanliness of Godavari river. A fund on large scale is being given for revival of 9 rivers like Krishna, Tapi, Narmada and others. Like this, a plan around Rs 50 to 100 crore under this project will be sent to the Centre. The centre is likely to give fund up to Rs 100 crore to make Godavari pollution-free.

गवार, भेंडीचे भाव गरम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भाजीपाल्याचे भाव उतरले

अहमदनगर (प्रतिनिधी)- किरकोळ भाजीबाजारात कडाडलेले भाजीपाल्याचे भाव उतरले असले तरी गवार आणि भेंडीचे भाव मात्र चढेच आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. शंभरी पार केलेला कांदाही किरकोळ बाजारात पन्नाशीत आला आहे.

अतिवृष्टी व अवेळी पाऊसानंतर सर्वच भागांत भाजीपाल्याचे वाढलेले उत्पादनाने मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे दर उतरले. पालेभाज्यांचे दर उतरल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

लाल कांद्याची आवक वाढल्याने अन् इतर राज्यातील मागणी थंडावल्याने कांद्याचे दरही घसरले आहे. शंभरी पार केलेला कांदा आता पन्नाशीत आला आहे. शंभर रुपये किलो भावाने विकले जाणारे टोमॅटो आता अवघ्या 10 रुपयांत मिळत आहे. तिशीत पोहचलेली मेथी, पालक, कोंथबिर पाच-दहा रुपयांवर आली आहे. 80 रुपये किलो मिळणारी वांगी 20 रुपये किलो विकली जात आहेत.

ओला वटाणा 100 रुपये किला होता. तो आता 25 ते 40 रुपये किलोने मिळू लागला आहे. लिंबूचेही दर घटले आहेत. गवार आणि भेंडीच्या भावाची थंडीतही गरमागरमी सुरूच आहे. गवार 80 रुपये तर भेंडी 60 रुपये किलो भावाने विक्री होत असल्याचे दिसले. मिरची तीस रुपयांवर घसरली आहे.

नगर: दो भाई बच गये… रवि, प्रकाश खतरे में

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भिंगार कॅन्टोन्मेंट । शिवसेना सदस्यांच्या वार्डात महिला आरक्षण

भिंगार (वार्ताहर) – आगामी कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी आज लेडीज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड लेडीजसाठी राखीव झाले. त्यामुळे भिंगार शिवसेना शहर प्रमुख रवींद्र लालबोंद्रे आणि प्रकाश फुलारी या दोघाही शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना दुसर्‍या वार्डाचा शोधाशोध करावी लागेल अथवा उमेदवारीसाठी कुटुंबातील महिला पुढे करावी लागणार आहे.

सात वार्ड असलेल्या भिंगार छावणी मंडळाची निवडणूक नव्या वर्षात होणार आहे. दोन महिलेसाठी आणि एक जागा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. पूर्वी मीना मेहतानी यांचा 1 नंतर तर शुभांजी साठे यांचा पाच नंबर वार्ड लेडीजसाठी राखीव होता. आज नव्याने महिला राखीव वार्डासाठी सोडत काढण्यात आली. त्यात लालबोंद्रे यांचा 4 नंबर तर फुलारी यांचा 6 नंबर वार्ड महिलेसाठी राखीव निघाला. यामुळे या दोघांनाही आता कुटुंबातील सदस्याला उमेदवारीला पुढे करावे लागेल अथवा स्वत:साठी दुसरा ‘सेफ’ वार्ड शोधावा लागणार आहे.

पाच नंबर वार्डाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भाजप नगरसेविका शुभांगी साठे यांचा वार्ड आता खुला झाला आहे. त्या स्वत: पुन्हा निवडणूक लढणार की पती निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार याकडे भिंगारकरांचे लक्ष लागून आहे. मीना मेहतानी यांचाही वार्ड आता खुला झाला आहे. एससीसाठी राखीव असलेला वार्ड नंबर सातमधील लोकसंख्या पाहता यंदाही या वार्डातील आरक्षण कायम राहिले आहे.

उपाध्यक्ष मुस्साभाई पुन्हा रिंगणात

राष्ट्रवादी च्या मीना मेहतानी, मुस्सा सय्यद आणि कलीम शेख या तिघाही विद्यमान नगरसेवकांचे वार्ड आहे तसेच राहिले आहेत. यातील उपाध्यक्ष मुस्सा सय्यद आणि कलीम शेख यांच्या वार्डात महिला आरक्षण पडते का? याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. पण आरक्षण सोडतीत ते बालंबाल बचावले.

टीम इंडिया मालिकेतील आव्हान कायम राखणार?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्टइंडीज या दोन संघांमध्ये सध्या ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर मालिका गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सामना डॉ वाय एस राजशेखरा रेड्डी या मैदानाव बुधवारी १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या भारत ३५६-९ विरुद्ध पाकिस्तान ५ एप्रिल २००५ नीचांकी धावसंख्या ७९ न्यूझीलंड विरुद्ध भारत २९ ऑक्टोबर २०१६ सर्वात मोठा विराज भारत १९० धावांनी विरुद्ध न्यूझीलंड २९ ऑक्टोबर २०१६ निसटता विजय भारत ५८ धावांनी विरुद्ध पाकिस्तान ५ एप्रिल २००५ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली ५ सामने १ नाबाद ५५६ धावा सर्वाधिक स्कोर १५७* सर्वाधिक शतके विराट कोहली ३ सर्वाधिक अर्धशतके विराट कोहली २ सर्वाधिक शतके १० एम एस धोनी सर्वाधिक बळी राणा नावेद १० षटके ० निर्धाव ५४ धावा ३ विकेट्स बेस्ट बॉलिंग फिगर १० षटके ६० धावा ४ विकेट्स रवी रामपॉल यष्टीरक्षक कामगिरी ७ झेल ३ यष्टीचित एकूण १० धोनी सर्वाधिक झेल १ सामना ३ झेल.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा , विराट कोहली , लोकेश राहुल , श्रेयस अय्यर , मनीष पांडे ,रिषभ पंत , केदार जाधव यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर , शिवम दुबे रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीत मोहंमद शमी , शार्दूल ठाकूर , दीपक चाहर , कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल आहेत.

विंडीज संघांच्या फलंदाजीची मदार इविन लुईस , शिमोन हेटमायर , ब्रेंडन किंग , निकोलस पुरण दिनेश रामदिन आहेत. . अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर , किरॉन पोलार्ड , शेफने रुदरफोर्ड केसरीक विल्यम्स आहेत. गोलंदाजीत जेसन होल्डर , किमो पॉल केसेदिक विल्यम्स खरी पिरे आहेत..

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Low response to FasTag, heavy traffic on toll plaza

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The toll plaza on Mumbai-Agra National Highway saw a low response from the commuters on FasTag. The National Highway Authority of India (NHAI) made FasTag compulsory from December 15. The first day of the FasTag proved to be a flop show, as very low the response was given by the commuters to FasTag.

Instead of making the functioning of toll disturbance-free, it created more traffic and chaos at Ghoti toll plaza.
The NHAI took help of 47 police personnel on Sunday to control traffic and unavoidable quarrels between the toll collector and commuter.

The first day of the FasTag started with traffic from Mumbai towards Nashik. The queue on toll plaza reached till the Taked-Ghoti​bridge near the Ghoti toll plaza.  On the other side, the traffic moving towards Mumbai increased in the afternoon, making the vehicles queue reach till the Ghoti Phata.

The toll plaza administration made two lanes open for vehicles with FasTag and another lane was opened for vehicles without FasTag. No major incidents were reported by the police at the toll plaza. The commuters vent anger as it was taking longer than expected.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले, हा दुर्मिळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैत्यन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड असून त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.

बोबडे शेतकऱ्यांचे कैवारी होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते सामान्यांचे वकिल होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश बोबडे यांचे अभिनंदन केले.

North Maharashtra shivers, mercury dips to 14 dC in city

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

North Maharashtra shivered as minimum temperatures dipped across the region with Nashik city being the coldest at 14.0 degrees Celsius in the region, followed by Malegaon city recording a minimum temperature of 15.5 degree Celsius and Jalgaon 15.6, on Sunday.

For the last three days, the minimum temperature level in the city is hovering around 13.0 degree Celsius. On Friday, the city recorded a minimum temperature of 12.6 degree C with a Max. of 28.1 degree Celsius, followed by a minimum temperature of 13.6 degree C (Max. 27.9) on Saturday — a slight rise of 1.4 degree Celsius from Friday’s minimum level.

According to meteorological sources, the minimum temperature in the city will hover around 14 degree Celsius to 16 degree between December 16 and December 21. Yesterday, Mahabaleshwar in the state recorded a minimum temperature 14.4 degree Celsius, Pune 15, Aurangabad 16.3, Parbhani 17.8, Nanded 16, Akola 17.3, Amaravati 18.4, Nagpur 16.8, Gondiya 17.5, Wasim 15 and Vardha 18.4 degrees Celsius.

Meanwhile, Usmanabad in the state was coldest at 13.8 degree Celsius, followed by Nashik which on Sunday recorded a minimum temperature level of 14.0 degree Celsius and a maximum of 28.3 degree. According to Skymet Weather, light rain is likely in three meteorological divisions of Vidarbha, Marathwada and North Madhya

Maharashtra during the next 24 to 36 hours.  Places like Nashik, Pune, Aurangabad, Akola, Amravati, Nagpur, Yavatmal and Jalna will experience these rains. The weather in the rest parts of Maharashtra, on the other hand, will remain completely dry. The rainfall activities would be beneficial for crops like orange and groundnut.

चाळीसगाव बंद घरातून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरातील हिरापूर रोडस्थित एकाच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून, आत ठेवलेले ९६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. याप्रकरणी चाळीसगव पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिलाल अन्ना पाटील रा.गणेशपूर, ह.मु.हिरापूर रोड, चाळीसगाव हे दि.१५ रोजी बाहेर गेले असता, अवघ्या तासाभरात त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोंडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले ९६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पोबरा केला.

याबाबत चाळीसगाव पोलीसात हिलाल अन्ना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत