Friday, October 30, 2026
Homeनाशिकखबरदारी म्हणून ओव्हरहेड वायर हटवल्या अन् पंचवटीकर दिवसभर ऑफलाईन मोडवर, नेमकं काय...

खबरदारी म्हणून ओव्हरहेड वायर हटवल्या अन् पंचवटीकर दिवसभर ऑफलाईन मोडवर, नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी
राष्ट्रपतींच्या आगामी सुरक्षा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी परिसरातील मार्गावरील ओव्हरहेड वायर हटवण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे परिसरातील इंटरनेट आणि केबल सेवा पूर्णपणे कोलमडली असून, पंचवटीकर दिवसभर ऑफलाइन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, खासगी बँका, सेतू कार्यालये तसेच मोबाईल वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

शहरातील अनेक रस्त्यांवर महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत खांबांवरून फायबर ऑप्टिकल, इंटरनेट व टीव्ही केबल्स टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या केबल्स टाकण्याबाबत किंवा त्यांच्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पूर्वतयारी वा समन्वय झालेला नाही. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला पावले उचलणे आवश्यक असले तरी, या कारवाईमुळे इंटरनेटवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. सुरक्षेचे उपाय राबवताना प्रशासनाने पर्यायी इंटरनेट किंवा केबलची व्यवस्था उपलब्ध करून देणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा : सहा मार्ग बंद; रामकुंडाकडे जाण्यास पर्यायी मार्ग, वाहनतळ घोषित

सध्याच्या डिजिटल युगात शासकीय कार्यालयांपासून खासगी व्यावसायिकांपर्यंत सर्वच कामे इंटरनेटवर चालतात. पंचवटीत काही ठिकाणची इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे सरकारी व खासगी बँकांचे व्यवहार, सेतू कार्यालयातील विविध ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, तसेच आर्थिक व्यवहार पूर्ण करणे कठीण झाले. विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सना लॅपटॉपवर वायफाय व इंटरनेट कनेक्ट न झाल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक मोबाईलधारकांनाही इंटरनेटचा स्पीड मंदावल्याने अडचणी आल्या.

दुरुस्तीसाठी लागणार अवधी
इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर दुपारपासून ग्राहकांच्या कॉलचा पाऊस पडला. सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत असले, तरी राष्ट्रपतींचा दौरा पूर्ण झाल्यानंतरच दुरुस्ती व इतर प्रक्रिया तातडीने पूर्ण न झाल्यास नागरिकांना आणखी काही दिवस या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

हेलिकॉप्टर

बद्रीनाथजवळ ६ प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; बचावकार्य सुरु

0
बद्रीनाथ | Badrinathचारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतणारे ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ बेपत्ता...