Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजओमराजे निंबाळकरांची PM मोदींसोबत भेट; ब्रेकफास्ट पे चर्चेत खासदारांसोबत काय झाली खलबतं?

ओमराजे निंबाळकरांची PM मोदींसोबत भेट; ब्रेकफास्ट पे चर्चेत खासदारांसोबत काय झाली खलबतं?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (शिंदे गट) खासदारांना विशेष नाश्त्यासाठी (ब्रेकफास्ट) आमंत्रित केले होते. या बैठकीत ठाकरे गटातून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले ६ खासदार आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे उपस्थित होत्या. नाश्त्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खासदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करत आगामी राजकीय वाटचालीसाठी विशेष कानमंत्र दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांची वैयक्तिक विचारपूस केली. “आपल्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा,” असा थेट कानमंत्र मोदी यांनी खासदारांना दिला. कुठल्याही प्रकारची विकासकामे असतील, तर थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संवाद साधावा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

- Advertisement -

ओमराजेंसोबत पंतप्रधानांच्या खास गप्पा
पंतप्रधान मोदी यांनी ब्रेकफास्टसाठी आलेल्या खासदारांसोबत स्वतंत्रपणे चर्चा केली. त्याच दरम्यान, ओमराजे यांच्यासोबत स्वतंत्रपणे संवाद साधताना त्यांच्या नियमित योगाभ्यासाबद्दल विशेष चौकशी केली. ओमराजेंच्या योगाच्या आवडीबद्दल समजल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना उत्सुकतेने प्रश्न विचारले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या योगाभ्यासाचा एक जुना व्हिडिओ थेट पंतप्रधान मोदींना आपल्या मोबाईलवर दाखवला. “तुम्ही दररोज किती वेळ योगा करता? आणि कशा पद्धतीने सराव करता?” अशी विचारणा करत पंतप्रधानांनी त्यांच्या दिनचर्येची बारकाईने माहिती घेतली.

Raj Thackeray: सिंहस्थाच्या नावाने नाशिककरांना खड्ड्यात घातलं; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

या बैठकीत शिवसेनेच्या सात खासदारांनी सहभाग घेतला होता. ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, ज्योती वाघमारे हे खासदार पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या ब्रेकफास्ट बैठकीत उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर असून ते देखील पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेली शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी, तसेच ‘जेन झी’ आंदोलनानंतरची देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांशी हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि मतदारसंघातील प्रलंबित कामांच्या मंजुरीच्या दृष्टीने या या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...