पश्चिम बंगाल | West Bengal
पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन नबिन उपस्थित होते. पण या सोहळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावर येताच एका वयोवृद्धाला मिठी मारली आणि पाया देखील पडले. मोदींच्या या कृतीने अनेकांना आर्श्चर्याचा धक्का बसला.
हे वयोवृध्द ९२ वर्षीय भाजपचे कार्यकर्ते माखनलाल सरकार यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना प्रेमाने मिठी मारली. या भावनिक क्षणानंतर माखनलाल सरकार कोण आहेत आणि भाजपमध्ये त्यांचे महत्त्व काय आहे, याबद्दल चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांची गळा भेट घेतली आणि पाया पडले त्यांचे नाव माखनलाल सरकार आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात जेष्ठ आणि वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचे वय ९२ वर्ष आहे. १९५२ साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अटक झालेली.
Nashik Crime News : किरकोळ वादातून सराईताचा वार; सलून चालकाची निर्घृण हत्या
कोण आहे माखनलाल सरकार?
वयोवृद्ध निष्ठावंत: माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांचे वय 92 वर्षे असून, आजही ते पक्षाच्या कार्यात सक्रिय आहेत.
जनसंघाचा काळ: माखनलाल सरकार यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली होती.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे सहकारी: माखनलाल सरकार यांनी भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केले आहे. मुखर्जींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपले आयुष्य पक्षसंघटनेला वाहिले.
‘एक विधान, एक निशान, एक प्रधान’: त्याकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी ‘परमिट’ (परवाना) घ्यावा लागत असे आणि तिथे स्वतंत्र ध्वज होता. याविरोधात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन छेडले होते. 1953 मध्ये जेव्हा मुखर्जी काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हजारो सत्याग्रही होते. माखनलाल सरकार हे त्या आंदोलनातील तरुण फळीचे नेतृत्व करत होते.
अटकेचा प्रसंग: पंजाब आणि जम्मूच्या सीमेवर (माधोपूर येथे) जेव्हा या आंदोलकांना रोखण्यात आले, तेव्हा मुखर्जींसोबत माखनलाल सरकार यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनी अनेक दिवस तुरुंगवासही भोगला.




