मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अभूतपूर्व उत्साह मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon NMC) राजकीय वातावरणात पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ७१४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर गेल्या तीन दिवसांची एकूण आकडेवारी ८१२ वर पोहोचली आहे. त्यामुळे आज (बुधवारी) होणाऱ्या अर्जाच्या छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, तांत्रिक चुकांमुळे कोणाचे पत्ते कट होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर २१ प्रभागातील सर्व ८४ जागांवर एकाही पक्षास उमेदवार उभे करता आलेले नाही.
राजकीय वर्तुळात सर्वात मोठी खळबळ तेव्हा उडाली, जेव्हा मध्यरात्री उशिरा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. युती होईल या आशेवर असलेल्या इच्छुकांची यामुळे चांगलीच धावपळ झाली. पहाटेपासूनच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अत्यंत गोपनीय रित्या आपल्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचे (AB Form) वाटप केले. ही प्रक्रिया इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की, इतर इच्छुक उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत संभ्रमाचे वातावरण होते.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल; आज छाननी
दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रबादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी आणि इस्लाम पार्टी यांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सातही कार्यालयांच्या परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने या भागाला यात्रेचे स्वरूप आले होते. आपल्या नेत्याचा अर्ज भरून बाहेर येताच समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भाजप अधिकृत उमेदवार
प्रभाग क्र. १ अ-एस.सी. महिला वंदना महेश वाघ, ब-एस.टी. पुरुष-कपिल शिवाजी कोळी, क-ओबीसी-अर्चना जगदीश गोडे, ड-सर्वसाधारण-विजय गोविंद देवरे प्रभाग क्र. ९ अ-एस.सी. संजय मोहन खडताळे, ब-सर्वसाधारण महिला निलिमा भिमेश्वर महाजन, क-ओबीसी महिला-राजश्री सूर्यकांत गिते, ड-सर्वसाधारण-गुलाब तानाजी पगारे, प्रभाग क्र. १० अ-एस.सी. महिला-तुळसाबाई संभाजी साबणे, ब-ओबीसी चुला देग खंडू पाटील, क-सर्वसाधारण महिला-आशा भिमा भडांगे, ड-सर्वसाधारण खुला-सुनील बाबुलाल गायकवाड, प्रभाग क्र. ११ अ-सर्वसाधारण पुरुष प्रविण मनोहर बच्छाव, ब-सर्वसाधारण महिला-नीलम रवींद्र हिरे, क-सर्वसाधारण महिला-हर्षिता विरेंद्र देवरे, ड-सर्वसाधारण पुरुष-दीपक सुनिल गायकवाड, प्रभाग क्र. १२ अ-एस.टी. महिला-पुनम दत्तू वसावे, ब-ओबीसी खुला सुनिल त्र्यंबक चौधरी, क-सर्वसाधारण महिला-वैशाली सुधीर जाधव, ड-सर्वसाधारण पुरूष-मदन बाबुलाल गायकवाड.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी; भाजपने ‘या’ माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट
शिवसेना अधिकृत उमेदवार
प्रभाग १ अ-अनु, जाती महिला आम्रपाली सचिन बच्छाव, ब-अनु जमाती जिजाबाई दिलीप पवार, क-ना.मा.प्र. महिला पुनम भाऊसाहेब अहिरे, सर्वसाधारण-निलेश एकनाथ काकडे प्रभाग २अ अनुसूचित जाती-सरला कैलास बागुल, ब-नामाझ महिला छायाबाई दीपक शिंदे, क-सर्वसाधारण महिला-पुनम दुर्गेश कोते, ड-सर्वसाधारण-अशोक (तानाजी) नारायण देशमुख प्रभाग ९ अ-अनु. जाती-नितीन झाल्टे, ब-नामाप्न महिला लताबाई सखाराम घोडके, क-सर्वसाधारण महिला-मिनाबाई दिनेश अहिरे, ड-सर्वसाधारण-नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, प्रभाग १० अ-अनुसूचित जाती महिला-जान्हवी जगदीश कासवे, ब-नामाप्र-दिनेश कमलाकर ठाकरे, क-सर्वसाधारण महिला-हर्षिता भरत लाडके, ड-सर्वसाधारण विशाल दिलीप पवार, प्रभाग ११ अ-नामाप्र-दिलीप मिका बच्छाव, ब-सर्वसाधारण महिला-आशाताई प्रकाश अहिरे, क-सर्वसाधारण महिला प्राची नरेंद्र पवार, ड सर्वसाधारण-निलेश भगवान आहेर, प्रभाग १२ अ-अनु. जमाती महिला-अंजना शिवाजी दाभाडे, ब-नामाप्र उमेश (दत्ता) विनायक चौधरी, क-सर्वसाधारण महिला राजश्री शरद पाटील, ड सर्वसाधारण-विनोद नधू वाघ.
कोणता पक्ष किती जागा लढणार?
भाजप – २०
शिवसेना (शिंदे गट) – २४
राष्ट्रवादी (अप) – १०
काँग्रेस – २२
राष्ट्रवादी (शप) – ०८
एमआयएम – ६०
सपा – २०
इस्लाम पार्टी – ४७




