Sunday, September 6, 2026
HomeनाशिकGirish Mahajan : "त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन, माझी मुंबईपर्यंतही नाही"; गिरीश...

Girish Mahajan : “त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन, माझी मुंबईपर्यंतही नाही”; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला

जळगाव | Jalgaon

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) होणाऱ्या संभाव्य प्रवेशाची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जळगावात (Jalgaon) एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याच कार्यक्रमात नाथाभाऊंचा जाहीर भाजप प्रवेश पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना आपल्या खास शैलीत खोचक टोला लगावला आहे.

माझी मुंबईपर्यंतही हॉटलाईन नाही, मी छोटा माणूस

एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश गिरीश महाजन यांच्यामुळे रखडला आहे का? असा प्रश्न विचारला असता महाजन यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “खडसेंचा प्रवेश माझ्यामुळे कसं काय रखडणार? मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट दिल्लीला (Delhi) हॉटलाईन आहे. मी तर छोटा माणूस आहे, माझी मुंबईपर्यंत (Mumbai) देखील हॉटलाईन नाही. मी आपल्या जळगाव जिल्ह्यापुरता बरा आहे. निश्चितच त्यांना जर वरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे तर ठीक आहे, यात कोणाची काही अडचण असण्याचं कारण नाही”, असे महाजन यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Eknath Khadse : अमित शाहांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली, पण…; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

खडसेंच्या जुन्या विधानाचा दिला दाखला

पुढे बोलताना महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या जुन्या विधानाचा दाखला देत म्हटले की, “मागच्या वेळेस खडसे म्हणाले होते की, आम्ही फोटो काढला, गळ्यात रुमाल टाकला आणि फोटोच गायब झाले असं काहीतरी ते म्हणत होते. आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही. मी काय भविष्यकार नाही आणि संजय राऊतही (Sanjay Raut) नाही”, असंही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...