Tuesday, September 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक ठरला देवदूत! 10 मिनिटात वाचवला तब्बल 1643 विद्यार्थ्यांचा जीव, नेमकं...

विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक ठरला देवदूत! 10 मिनिटात वाचवला तब्बल 1643 विद्यार्थ्यांचा जीव, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला असून अनेक या पुरामुळे ७८८ जणांचा मृत्यू झाला असून २५०० हून अधिक नागरिक पर्यटक बेपत्ता आहे. या भीषण पुराचा फटका भारताला देखील बसला असून २४५ भारतीय पर्यटकही अद्याप बेपत्ता आहे. अशातच नेपाळमधील एका मुख्याध्यापकाच्या चतुराईने तब्बल 1643 मुलांचा जीव वाचला आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. , त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेचे 47 वर्षीय इंग्रजी शिक्षक आणि मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी 1,643 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

काय घडली घटना?
त्रिशुली येथील त्रिभुवन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी विद्यार्थ्यांचेच नाही तर शिक्षकांचे देखील प्राण वाचवले. सकाळी 900 विद्यार्थी शाळेत पोहोचले होते, तर सुमारे 700 विद्यार्थी पायी किंवा बसने शाळेकडे येत होते. मात्र सकाळी सुमारे ९.२० वाजता मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना एका मित्राचा फोन आला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या मित्राने त्यांना चेतावणी दिली की, नदीने त्यांचे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे समोर दिसत असलेलं गाव काही सेकंदात बुडालं अन् पाणी आपल्याकडं येणार याची जाणीव राजेंद्र यांना झाली.

पुराचे पाणी शाळेपर्यंत पोहोचायला १० ते १५ मिनिटे लागणार होती अन् समोर तब्बल १७०० विद्यार्थी… एवढ्या मोठ्या महापुरातून मुलांना कसे वाचवायचे, यासाठी मुख्याध्यापकांनी प्लॅनिंग केले अन् त्यावेळी शाळेच्या आवारातील आणि वसतिगृहात अंदाजे ९०० विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी रवाना केले. तर ७०० हून अधिक विद्यार्थी पायी किंवा बसने येत होते. यांना माघारी पाठवणे देखील महत्त्वाचे होते. राजेंद्र यांनी जराही वेळ न घालवता, आपत्कालीन घंटा वाजवली आणि सर्व वर्गखोल्या रिकाम्या करण्याचा आदेश दिला.

संपादकीय : ३१ ऑगस्ट २०२६ – अमेरिकन स्वप्न संकटात

लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर काही वेळातच उतारावरून पाण्याचा प्रचंड लोंढा खाली आला आणि शाळेची तीन मजली इमारती पूर्णपणे वाहून गेली. शिक्षक राजेंद्र दवाडी यांनी 1,643 निष्पाप मुलांचे प्राण वाचवले असले, तरी या प्रक्रियेत शाळेतील इतर दोन शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही शिक्षकांची काही दिवसांपूर्वीच इतिहास विषयाचे शिक्षक म्हणून शाळेत नियुक्ती झाली होती. त्यातील एक शिक्षक सकाळचा अतिरिक्त तास घेऊन नाश्ता तयार करण्यासाठी नदीकाठी असलेल्या आपल्या भाड्याच्या खोलीवर परतले होते, मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह त्यांना वाहून घेऊन गेला. तर शाळेचे केअरटेकर सुलतान लामा दुर्दैवाने शाळेचे गेट बंद करण्यासाठी परत खाली गेले आणि रौद्र रूप धारण केलेल्या पुराच्या पाण्यात अडकले.

दरम्यान, या घटनेनंतर राजेंद्र दवाडी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, आपण कोणतेही असामान्य काम केले नसून केवळ शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून आपले कर्तव्य बजावले, अशी नम्र भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या निर्णयामुळे मात्र नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. आपत्तीच्या काळात काही सेकंदांत घेतलेला योग्य निर्णय किती जीव वाचवू शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे.

ताज्या बातम्या

अवैध मावा-गुटखा विक्रीवर एलसीबीचा छापा; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
राहुरी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा, गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई केली. मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी पोलीस...