नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ब्लॉकच्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. हे एफआयआर कनॉट प्लेस, टिळक मार्ग, बाराखंबा आणि मंदिर मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी संध्याकाळी ४ वाजता इंडिया आघाडीच्या नेत्यांना चहाचे निमंत्रण दिले आहे. या टी डिप्लोमसीतून या आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.
इंडिया आघाडीचे नेते संध्याकाळी नवी दिल्ली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेला राहुल गांधींसोबत ममता बॅनर्जी आणि इतर महत्त्वाचे नेते सहभागी होतील. याशिवाय दिल्ली हायकोर्टात जंतर मंतरवर आंदोलन बंदी केल्याप्रकरणी याचिकेवर सुनावणी होणार आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
नाशिक @ ३५.७,दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील उच्चांकी तापमान
राहुल गांधींनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
राहुल गांधी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, आज मी इंडिया आघाडीचे नेते, विरोधी पक्षांचे खासदार, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजातील सहकाऱ्यांना माझ्या घरी चहासाठी आमंत्रित केले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठीच्या या जनआंदोलनात आपण सर्व एकजूट आहोत आणि हे आंदोलन सुरूच राहील. चहानंतर, आम्ही सर्वजण माध्यमांसमोर आपली मते मांडू. सर्व आंदोलने एकच असतात (All protests are one) राहुल यांच्या All protests are one या लाईनची विशेष चर्चा रंगली आहे.
आज मैंने INDIA गठबंधन के नेताओं, विपक्षी सांसदों, छात्र संगठनों और सिविल सोसाइटी के साथियों को अपने घर चाय पर बुलाया है।
लोकतंत्र की रक्षा के इस जनांदोलन में हम सब एक साथ हैं – और ये आंदोलन लगातार जारी रहेगा।
चाय के बाद हम सभी मिलकर मीडिया के सामने अपनी बात रखेंगे।
All protests are one.
#Unity— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2026
माफीचे साक्षीदार व्हा
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले होते. ज्यात २०० अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. ते आम्हाला सगळी माहिती पुरवतात असा दावा केला होता. त्याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सध्या झोप लागत नाही. ते मला मेसेज करतात. आम्ही त्यांना तुम्ही माफीचे साक्षीदार बना असं सांगितले आहे. ते मुख्य आरोपी नाहीत, त्यांनी चूक केली आहे. राजीनामा द्यावा आणि पदावरून दूर व्हावे असं राहुल गांधी यांनी म्हटले होते.




