नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने (MNS) ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, मनसेचा एकही आमदार (MLA) निवडून आला नाही. यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले.
हे देखील वाचा : Cabinet Expansion : शिंदेंच्या मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक आले समोर; बंडात साथ दिलेल्या ‘त्या’ दोघांचा पत्ता होणार कट?
याबाबत आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य करत राज ठाकरेंना डिवचले आहे. ते आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आलें असता त्यानी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले.आरक्षण जाणार असा प्रचार करणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे. लाडकी बहीण, महिलांनी मतदान केले. संविधान हे राजकारणाच्या पलिकडे आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. मुख्यमंत्रीपदाची महाविकास आघाडीत रेस होती. आमच्या तिन्ही नेत्यांनी अगोदरच सांगितले होते की आम्ही रेस मध्ये नाही, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी फडणवीसांच्या विश्वासूने भरला अर्ज
पुढे ते म्हणाले की, राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली. आमच्याशिवाय सरकार येणार नाही, असे ते बोलले होते. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्या जागा निवडून येत नाही. राज ठाकरे युतीत येतील असे मला वाटत नाही. मी आहे तर त्यांची गरज काय? त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे, असा चिमटा काढत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी आम्ही महायुतीच्या मित्रपक्षांकडे केली आहे. आम्हाला दोन मंत्री पद मिळणार असल्याचे महायुतीच्या पक्षांकडून सांगण्यात आले आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
हे देखील वाचा : Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करू नये”; बावनकुळेंची जहरी टीका
ईव्हीएमबाबत आठवले काय म्हणाले?
विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये, तसेच त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकसभेला (Loksabha) ईव्हीएम खराब आहेत असे आम्ही म्हणालो का? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना केला. तसेच त्यांनी पराभव मान्य केला पाहिजे. ईव्हीएम मशीन हे तुम्हीच आणले होते, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल. जरी बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आम्हाला जास्त मतदान मिळेल, असे त्यांनी सांगितले.