Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविरोधकांना हलक्यात घेऊ नका, विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाणांनी आमदारांचे कान टोचले

विरोधकांना हलक्यात घेऊ नका, विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाणांनी आमदारांचे कान टोचले

मुंबई | Mumbai
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनाला भाजपचे अनेक आमदार गैरहजर राहत आहेत. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संतापले. रवींद्र चव्हाणांनी दांडीबहाद्दर आमदारांचे कान टोचले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्व आमदार व मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका असे म्हणत त्यांनी अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांची शाळा घेतली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या हातामध्ये रिपोर्ट कार्ड ठेवले.

यापुढे विधीमंडळात गैरहजर राहताना पक्षाला त्याचे लेखी कारण द्यावे लागणार आहे. नाहीतर संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार व मंत्री यांच्या विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाण आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

Donald Trump On Iran: इराणवरील युध्द आम्ही जिंकलो, आता हल्ल्यासारखं काहीच उरलं नाही; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

भाजप आमदार आणि मंत्री यांच्या विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाण चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यापुढे गैरहजर राहिलात तर पक्षाला लेखी कारण द्यावे लागणार नाहीतर संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही करणार असल्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्या. त्यामुळे आता यापुढे सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते संध्याकाळी संपेपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांना सभागृहात बसावे लागणार आहे.

पाच आमदारांचा एक गट तयार करून त्यातील एका आमदाराकडे उपस्थितीची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीवर चंद्रकांत पाटील लक्ष ठेवणार असून, विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर पक्ष आणि संसदीय कामकाज विभागाकडून कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित आमदार किती वेळ सभागृहातील कामकाजात सहभागी होतात? याचा रिपोर्ट गटाचा आमदार हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांकडे देईल.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : बळी मंदिर उड्डाणपुलावर अपघात; महिला जागीच ठार,...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पंचवटी परिसरातील (Panchvati Area) बळी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी (२७ जुलै) रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगाने...