Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik SIG: नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा संजय येनपुरेंनी पदभार स्विकारला

Nashik SIG: नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा संजय येनपुरेंनी पदभार स्विकारला

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक (एसआयजी) म्हणून आयपीएस संजय येनपुरे यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी पदभार स्वीकारला. नाशिक पोलीस आयुक्तालयात झालेल्या एका छोटेखानी समारंभात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुष्पगुच्छ देऊन येनपुरे यांचे स्वागत केले आणि त्यांच्याकडे पदभाराची सूत्रे सोपवली. नाशिक परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे सध्या रजेवर असल्याने हा पदभार आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून हस्तांतरित करण्यात आला.

नाशिक भौगोलिक संवेदनशीलतेच्या दृष्टीने महत्वाचे
नाशिक पोलीस परिक्षेत्र हे भौगोलिक आणि संवेदनशीलतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या परिक्षेत्रात नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांचा समावेश होतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी नियंत्रण आणि सीमावर्ती भागातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याची मुख्य जबाबदारी आता नूतन महानिरीक्षक संजय येनपुरे यांच्या खांद्यावर असणार आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेल किमतीत १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढ; नाशिकसह इतर शहरातील काय आहे नवे दर?

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आव्हान
येनपुरे यांच्या आगामी कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा. देशा-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन (क्राऊड मॅनेजमेंट) आणि वाहतूककोंडी फोडणे यासाठी आतापासूनच पायाभूत नियोजन करावे लागणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये चोख नियोजन करणे, गुप्तचर यंत्रणा सतर्क ठेवणे आणि आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा सज्ज ठेवण्याला आपले प्राधान्य असेल, असे संकेत नूतन महानिरीक्षकांनी दिले आहेत.

कृती आराखडा निश्चित
पदभार स्वीकारल्यानंतर संजय येनपुरे यांनी परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्राथमिक आढावा घेतला. लवकरच पाचही जिल्ह्यांतील पोलीस प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आगामी कृती आराखडा निश्चित केला जाणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...