Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यांनंतर जेल बाहेर, काय...

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यांनंतर जेल बाहेर, काय आहे नेमकं कारण?

बीड | Beed
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यानंतर जेल बाहेर पडला आहे. जयराम चाटेच्या भावाचे दोन मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला १२ व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हा वेळ दिला गेला आहे.

बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलिस बंदोबस्तात बाहेर पडला. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिने जयरामच्यासोबत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. कोर्टाने त्याला विधीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी चार या वेळेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

विभागात ८९२ बोगस कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे; शालार्थ रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर ६ मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील चाटे याला कारागृहाबाहेर सोडण्यास विरोध केला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे की आरोपी कसे वागले आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. आरोपीला बाहेर सोडल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उज्वल निकम यांनी सांगितले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण?

हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह असून ही केस महाराष्ट्राची आहे. सव्वा वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत. जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...