Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ला ठाकरे गटाकडून कायदेशीर आव्हान; ६ फुटीर खासदारांना अरविंद सावंतांनी...

शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ठाकरे गटाकडून कायदेशीर आव्हान; ६ फुटीर खासदारांना अरविंद सावंतांनी थेट धाडलं पत्र

मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाहीये. शिवसेनेच्या खासदारांनी विलिनीकरणाचा (Merger) दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेल्या ६ फुटीर खासदारांना घेरण्यासाठी मोठे कायदेशीर पाऊल उचलले आहे. ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाकडून या खासदारांना थेट पत्र धाडण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्यासह बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर या पत्राला राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

- Advertisement -

Nashik Accident News : सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली बस उलटली; एकाचा मृत्यू, २५ जखमी

अरविंद सावंत यांनी पत्रात काय म्हंटले आहे?
ठाकरे गटाने पाठवलेल्या या पत्रात फुटीर खासदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये माध्यमांच्या वृत्ताचा दाखला देण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचे विविध बातम्यांच्या माध्यमातून समोर येत असल्याचा मुद्दा या पत्रात मांडण्यात आला आहे.

फुटीर खासदारांकडून आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात कायदेशीररित्या विलीन झाल्याचे निव्वळ एक ‘आभासी चित्र’ निर्माण केले जात आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद 4 चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाने या पत्रात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

  • विलीनीकरण हे केवळ विधिमंडळातील गटाचे नसून मूळ राजकीय पक्षाचे असते.
  • मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वाने अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत.
  • खासदारांना विलीनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो; मात्र विलीनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नसतो.
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली नाही.
  • त्यामुळे सहा खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

जनादेशाच्या विरोधात जाणे
पत्रात पक्षाने असा दावा केला आहे की, संजय दिना पाटील यांना मिळालेला विजय हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि पक्षाच्या अधिकृत चिन्हामुळे मिळाला होता. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्याच पक्षाचे विलीनीकरण झाल्याचा दावा करून दुसऱ्या गटात जाणे हे मतदारांनी दिलेल्या जनादेशाच्या विरोधात असल्याचा अप्रत्यक्ष संदेशही या पत्रातून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या