Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Sinhastha Kumbha Mela Dhwajarohan: सिंहस्थ कुंभपर्वाला सुरवात; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या...

Nashik Sinhastha Kumbha Mela Dhwajarohan: सिंहस्थ कुंभपर्वाला सुरवात; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी
बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीत सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद झाला आहे. शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंचवटीतील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रामकुंडावर झालेला हा सोहळा आणि दोन्ही तीर्थक्षेत्रांवर एकाच मुहूर्तावर फडकलेले धर्मध्वज यामुळे नाशिकच्या धार्मिक इतिहासात महत्त्वपूर्ण क्षणाची नोंद झाली.

- Advertisement -

ऐतिहासिक सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे खासदार डाॅ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
नाशिकमधील रामकुंडावर ध्वजारोहण होत असतानाच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावरही ध्वजारोहणाचा विधी पार पडला. नाशिकच्या रामकुंडावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावर दक्षिण शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत धर्मध्वजाचे पूजन व रोहण केले जात आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रांवर एकाच शुभमुहूर्तावर सिंहस्थ कुंभपर्वाचा प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ आणि परिसरातील रस्ते भगव्या पताका, फुलांच्या माळा आणि आकर्षक सजावटीने सजवण्यात आले होते. साधू-महंत आणि भाविकांच्या उपस्थितीने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती येणे ही घटना नाशिकच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. कुंभाच्या ध्वजारोहणाला आतापर्यंत कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा सर्वोच्च पदांवरील व्यक्ती आल्या नव्हत्या. मात्र यंदा प्रथमच राष्ट्रपती या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. ३० ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर ३ दिवसीय विशेष यज्ञ आणि धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. आजच्या ध्वजारोहणानंतर उद्या १ नोव्हेंबरला श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे.

Nashik Sinhastha Kumbha Mela 2026: सिंहस्थ कुंभपर्वाचा शंखनाद; नाशिक त्र्यंबकेश्वरला एकाच वेळी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार

पंचवटीतील रामकुंड परिसरात ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभ पूजन, ध्वजपूजन आणि त्यानंतर निर्धारित शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

कुंभपर्वाचा आरंभ करण्यासाठी ध्वजारोहण सोहळ्यासाठी वर्षभरापासून नाशिकमध्ये विकासकामांचा धडाका सुरू होता. तर दोन दिवसांपासून नाशिकसह आणि त्र्यंबकेश्वर ध्वजारोहण सोहळ्यासाठी सजवायला सुरूवात झाली होती. गोदावरी काठ परिसर, मंदिरे फुलांनी तसेच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अवघी नाशिक नगरी झेंडे आणि पताकांनी भगवेमय करण्यात आली आहे. यावेळी ध्वजारोहण सोहळ्यासाठी रामकुंडवर 51 फूट उंचीचा मुख्य धर्मध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. यासाठी पंचधातूंचा वापर करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर तब्बल 31 फूट उंचीचा मुख्य ध्वजस्तंभ उभारला आहे. या स्तंभाला 62 किलो पितळाचा मुलामा आहे. दोन्ही ध्वजारोहण सोहळे एकाचवेळी करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिकमधून (रामकुंड) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमधून (कुशावर्त) उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शंकराचार्यांनी कुशावर्त कुंडात स्थान केले.

ताज्या बातम्या

India Alliance : दिल्लीत इंडिया आघाडीची ‘वोट बचाओ, देश बचाओ’ रॅली;...

0
नवी दिल्ली | New Delhi निवडणूक आयोगाची 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडीने केंद्र सरकार...