Monday, November 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल; शिक्षणातील सवलती, रखडलेला वसतिगृहासह...

मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल; शिक्षणातील सवलती, रखडलेला वसतिगृहासह ४ मोठे निर्णय

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले असून आता राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिक्षणातील सवलती, रखडलेला वसतिगृह निर्वाह भत्ता, परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण अशा विविध बाबींशी संबंधित शासन निर्णय आणि प्रशासकीय आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअर यांसारख्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयांनंतर जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

१. मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती
राज्य सरकारने तंत्रशिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ देण्याचे निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत. याबाबत संबंधित विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र मराठा विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेताना विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

२. वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी
EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा रखडलेला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यासाठी सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पात्र विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासकरून, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भोजन आणि इतर दैनंदिन खर्चाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. त्यामुळे 200 कोटींच्या निधीमुळे प्रलंबित देयकांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

३. सारथीच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल
मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या धोरणानुसार परदेशातील विद्यापीठांची शिक्षण फी थेट संबंधित विद्यापीठाला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या खर्चावरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना अतिरिक्त खर्चासाठी दरवर्षी १,५०० अमेरिकन डॉलर, तर ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १,१०० GBP अतिरिक्त भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठांची निवड आणि गुणवत्तेचे निकष ठरवण्यासाठी QS Ranking आधारित पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या बदलामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या मराठा आणि संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

४. १,४४० मराठा-कुणबी तरुणांना मोफत वाहन प्रशिक्षण
सारथी संस्थेच्या माध्यमातून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांना मोफत ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड येथील IDTRS संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किमान 1,000 लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी निर्माण करण्यावर भर देणारा आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीग्रस्त 1 हजार 792 विहिरींसाठी 2.61 कोटींचा निधी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या तसेच बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारच्या सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो)...