Friday, August 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCJP च्या पथकावर हल्ला; अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भाजपचे गुंड...

CJP च्या पथकावर हल्ला; अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भाजपचे गुंड…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राजस्थानची राजधानी जयपूरमधील बागरू गावात कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. शाळेची पाहणी करायला गेलेल्या सीजेपीच्या लोकांना तेथील गावकऱ्यांनी हाकलून लावले. या मुद्द्यावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ शेअर करत दीपके यांनी विचारले, “राजस्थानमध्ये काय चालले आहे? भाजपचे गुंड आशुतोष आणि इतर सीजेपी कार्यकर्त्यांच्या जीवावर उठले आहेत. राजस्थान पोलीस असे हल्ले कसे सहन करू शकतात?”

जयपूरमधील बागरू विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी शाळेत सीजेपीचे सह संयोजक आशुतोष रांका आपल्या कार्यकर्त्यांसह पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील लोकांनी त्यांचा विरोध केला. रामपुरा कंवरपुरा या गावात स्थानिकांनी सीजेपीच्या पथकावर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्यात सीजेपीचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

सरकारी शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJPच्या टीमवर तुफान दगडफेक; जयपूरमध्ये सकाळीच मोठा राडा!

दुसऱ्या एका पोस्टमध्ये दीपके यांनी लिहिले की, राजस्थानमध्ये भाजपच्या गुंडांनी आशुवर हल्ला केला. आशु आणि इतर सीजेपी स्वयंसेवकांना मारहाण करून जखमी करण्यात आले. राजस्थान पोलिसांनी हे घडू दिले, असा आरोपही दीपके यांनी केला.

हा सुनियोजित हल्ला
आशुतोष रांका म्हणाले, “आज संपूर्ण देशाने भाजपाची गुंडगिरी पाहिली. पोलिसांना हा प्रकार आधीपासून माहीत होता. तरीही त्यांनी हात वर केले आणि आम्ही काहीच करणार नाही, असे सांगितले. मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून हल्ला करण्यात आला आहे. गुंडानी आधीच दगड आणून ठेवले होते. आमच्या एका कार्यकर्त्याचा हात तोडला गेला. महिलांनाही गुंडांनी सोडले नाही. मदन दिलावर यांच्या इशाऱ्यावर हा सुनियोजित हल्ला करण्यात आला. ४८ तासांत या सर्व गुंडांना अटक करण्यात यावी.”

जनावरांच्या गोठ्यात शाळेचे वर्ग भरवले जात आहेत
“आम्ही भाजपाच्या गुंडगिरीला अजिबात घाबरणार नाही. जनावरांच्या गोठ्यात शाळेचे वर्ग भरवले जात आहेत. या लोकांना लाज वाटायला हवी. एक वर्षापूर्वीच मी या शाळेची पाहणी केली होती. तेव्हाही ही शाळा गोठ्यात चालवली जात होती. आजही गोठ्यातच शाळा आहे. आम्ही शाळा नीट करण्याची मागणी करण्यासाठी तिथे गेलो होतो. पण आमच्यावर हल्ला करण्यात आला”, असा आरोप आशुतोष रांका यांनी केला.

ताज्या बातम्या

आजच्या पिढीनं न बोलणंच उत्तम; काँग्रेसमधील सुसंवादावरून नाना पटोलेंनी सुप्रिया सुळेंना...

0
मुंबई | Mumbai २०१४ च्या राजकीय घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या...