Monday, December 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNana Patole : वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा - काँग्रेस...

Nana Patole : वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. त्यामुळे राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून केली आहे.

- Advertisement -

काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहेत. काँग्रेसने या निवडणुकीतील पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडले आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? असे सवाल पटोले यांनी केले आहेत.

हे देखील वाचा Shivshahi Bus Accident: गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर आणि चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

हे देखील वाचा देशदूत ई-पेपर नाशिक २९ नोव्हेंबर २०२४

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणा-या व्यक्तींकडून उपस्थित केल्या जात आहेत. लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी एक्स या समाज माध्यमात म्हटले आहे.

हे देखील वाचाEknath Shinde : महायुतीची मुंबईतील बैठक रद्द! काळजीवाहू CM एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर दोन तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशीराने का येत होता? संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२% मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२% मतदान कसे झाले? प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण एक मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही? रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फूटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत? राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते? मतदानाच्या दुस-या दिवशी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी ६६.५% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली? असे सवाल पटोले यांनी निवडणूक आयोगाला केले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या