Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाICC कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताचे अव्वल स्थान मजबूत

ICC कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताचे अव्वल स्थान मजबूत

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या (Test Match) मालिकेत टीम इंडियाने २-० ने मालिका विजय संपादन केला आहे. ही मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC Test Championship) दृष्टीने अतिशय महत्वाची असल्याने या मालिकेच्या निकालाचा परिणाम आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : भारताचा बांगलादेशला व्हाईट वॉश; दुसऱ्या कसोटी विजयासह सिरीजवर कोरलं नाव

बांगलादेशविरूद्धच्या विजयाने भारताचे (India) अव्वल स्थान अधिक मजबूत झाले आहे. भारताचे ११ सामने झाले असून यामध्ये भारताने ८ विजय आणि २ पराभव स्वीकारले आहेत. बांगलादेशविरूध्द भारतीय संघाने जरी मालिका विजय संपादन केला असला तरी भारतीय संघासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे (New Zealand and Australia) तगडे आव्हान असणार आहे.

हे देखील वाचा : IND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची नांगी; विजयासाठी ९५ धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळविण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकेत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली तर भारतीय संघ सलग तिसऱ्या वर्षी अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाची टक्केवारी १२ सामन्यात ८ विजय आणि ३ पराभवामुळे ६२.५० आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; दरोड्यासाठी केली रेकी

तसेच सध्याच्या घडीला श्रीलंका,भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला कडवी झुंज देऊ शकतात. श्रीलंका संघाचे ९ सामन्यात ५ विजय आणि ४ पराभवासह ५५.५६ टक्के गुण आहेत. त्यासोबतच श्रीलंका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. या आकडेवारीमध्ये इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.याशिवाय दक्षिण आफ्रिका पाचव्या तर न्यूझीलंडचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

सलिल परांजपे, नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या