नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारकडून (Central Government) नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ समितीने वित्तीय सेवा विभागाचे (DFS) सचिव संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांचा कार्यकाळ उद्या १० डिसेंबर रोजी संपत आहे. त्याआधी नवीन गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “तुम्ही पुन्हा येईल म्हणाले नाहीत, तरी आलात…”; देवेंद्र फडणवीसांकडून भाषणावेळी चिमटे
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) २६ वे गव्हर्नर असून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. मल्होत्रा ११ डिसेंबर रोजी गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. केंद्र सरकारने २०२२ मध्ये संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे आरबीआयच्या (RBI) गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : अजितदादांचा जयंत पाटलांना टोला; म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम झालाय…”
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे १९९० च्या बॅचचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे अध्यक्ष आणि एमडी झाले होते.त्यांनी कानपूरमधून कॅम्प्यूटर विज्ञानमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे.