Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGadchiroli Snake Bite: आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; मध्यरात्री झोपेत घडली दुर्दैवी...

Gadchiroli Snake Bite: आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; मध्यरात्री झोपेत घडली दुर्दैवी घटना

गडचिरोली | Gadchiroli
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील धानोरा (Dhanora) तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत (Ashramschool) सर्पदंशाची (SnakeBite) धक्कादायक घटना घडली आहे. रात्री झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू (Three Students Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जपतलाई येथील आश्रमशाळेचा समावेश महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत आश्रमशाळांच्या यादीत आहे.

मध्यरात्री अचानक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी रात्री जेवण करून आश्रमशाळेतील निवासाच्या ठिकाणी झोपल्या होत्या. रात्री साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी हालचाली सुरू केल्या. मात्र, उपचारादरम्यान काही विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर बनली. दीपिका लकडा (इयत्ता सहावी) आणि सुष्मिता मंडल (इयत्ता आठवी) यांना धानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच दोघींचा मृत्यू झाला.
त्यानंतर अनु कोरेटी (इयत्ता दुसरी) हिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू
सर्पदंश झालेल्या अन्य विद्यार्थिनींवरही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. प्राथमिक वृत्तानुसार दीपिका मडावी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुटुंबाचा आक्रोश
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा तडफडून मृत्यू झाल्याचे पाहून पालकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आश्रमशाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मिळालेल्या माहितीनुसार, या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पलंग उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी मुलींना नेहमीप्रमाणे खाली जमिनीवर गादीवर झोपावे लागले. या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी घटनेच्या वेळी वसतिगृहाची महिला अधीक्षक गैरहजर होत्या.

संपादकीय : १० ऑगस्ट २०२६ – आर्थिक निकषांंवर आरक्षणाचे धाडस

ताज्या बातम्या

Nashik News : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटींचा कृती आराखडा; ७७७...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी ८४...