Sunday, October 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News: महात्मा फुले चौक परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून तीन ते चार...

Nashik Crime News: महात्मा फुले चौक परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून तीन ते चार वाहनांची तोडफोड

नवीन नाशिक | प्रतिनिधी
महात्मा फुले चौक परिसरात अज्ञात समाजकंटकांनी तीन ते चार वाहनांची दगड व दांड्यांच्या साहाय्याने तोडफोड केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौक परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक करत तसेच दांड्यांच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली. या प्रकारात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात संपर्क साधला. माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

Supreme Court: मोठी बातमी! तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास…; ‘पेड पिरियड लीव’वर सर्वोच्च न्यायालयाचं मोठ निरिक्षण

दरम्यान, ही तोडफोड नेमकी कोणी केली आणि कोणत्या कारणामुळे केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्रोपचारांचा बनाव रचून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्याविरुद्धच्या कायदेशीर...