Thursday, December 12, 2024
HomeनाशिकNashik News : सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

Nashik News : सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरणावर (Bhavali Dam) फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) गोसावीवाडी येथील पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर काल (दि.२१) रोजी पुन्हा एकदा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत मायलेकींचा मृतदेह आढळून आला होता. या दोन्ही घटनांमुळे नाशिक शहरासह इगतपुरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भावली धरणात पाच जण बुडाले

अशातच आता या दोन्ही घटना ताज्या असतानाच सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) कुंदेवाडी (Kundewadi) येथील देव नदी बंधाऱ्यात (Barrage) बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक काळू जाधव (१६) व अमित संजय जाधव (वय १६) रा. आंबेडकरनगर, वावी वेस अशी मृतांची नावे आहेत. या दोघांनीही दहावीची परीक्षा (SSC Exam) दिलेली होती.

हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेला सार्थक जाधव हा कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याच्या वडिलांचेही (Father) निधन झालेले असून त्यास एक लहान भाऊ आहे. तर अमित जाधव हा देखील कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्यास एक बहिण देखील आहे. या दोघांच्याही मृत्यूमुळे वावी वेस (Vavi Ves) गावासह सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा : Dombivli MIDC Blast : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या