Tuesday, July 21, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग; शिक्षण...

मोठी बातमी! मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग; शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा सोपवणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीमध्ये सध्या मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच जंतर मंतरवर (Jantar Mantar) पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरुप धारण केले आहे. नीट परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी आज कॉकरोच जनता पार्टीकडून संसद मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सुरु होताच आंदोलकांवर शिघ्रकृती दलाकडून लाठीचार्ज (Lathi Charge) करण्यात आला. या सर्व घडामोडींच्या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) हे सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. प्रधान अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

नीट परीक्षा घोटाळ्याचे (NEET Exam Scam) वादळ आता थेट केंद्र सरकारच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत उग्र रूप धारण केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईने ‘जंतर-मंतर ते संसद’ असा धडक मोर्चा काढला आहे. असे असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे.

- Advertisement -

Sonam Wangchuk: माझी तब्येत ठीक, मला संसदेवरील मोर्चात जाऊ द्या; सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय याकडे बघावे लागणार आहे, कारण सीजेपीच्या आंदोलनाची मुख्य मागणी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा आहे तर त्याला पार्श्वभूमी आहे नीट पेपरफुटीची, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कॉक्रोच जनचा पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा पुढे निघाला. मोठा पोलिस बंदोबस्त संसद परिसरात बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आहे.

आंदोलकांमध्ये संताप
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात विद्यार्थी महिन्याभरापासून सातत्याने जंतर-मंतरवर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा, या मागणीवर तरुण ठाम आहेत. आज आंदोलकांनी सुरक्षा भिंत भेदून संसदेच्या गेटपर्यंत मुसंडी मारल्यामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा 65 टक्के भरले

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून धिम्या गतीने का होईना नवीन पाण्याची धरणात आवक होत...