मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे (Minister Dhananjay Munde) निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये राज्य सरकारने आता नवीन एसआयटीची स्थापना केली असून आज पुन्हा एकदा कराडला बीड न्यायालयात हजर केले जाणार आहे.वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर कराडवर मकोका लावण्यात आला.
दुसरीकडे वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मकोका लागल्यानंतर त्याच्या आई आणि पत्नीसह कार्यकर्त्यांकडून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.यावेळी कराडच्या पत्नी मंजली कराड (Manjali Karad) यांनी पती वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत माझ्या पतीला अडकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) हल्लाबोल करत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
हे देखील वाचा : Santosh Deshmukh Case : “एसआयटीचे प्रमुख तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी…”; वाल्मिक कराडच्या पत्नीचा गंभीर आरोप
यावेळी माध्यमांशी बोलतांना मंजली कराड म्हणाल्या की, “मराठा, मराठा काय करतो,मीही ९६ कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिध्द करा, यांना जातीवाद करायला कोणी शिकवला, जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जात आहे.आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, काल (मंगळवार) वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर त्यांच्या आईसह पत्नी व कार्यकर्त्यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच परळी शहरातील दुकाने देखील बंद करण्यात आले होते. त्यानंतर आज देखील परळी शहरातील (Parali City) अनेक दुकाने उघडलेली नाहीत. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड याच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे.तर आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नसतांना परळी शहरातील निम्मी बाजारपेठ बंद असल्याचे सांगितले जात आहे.