Thursday, April 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Case : खरात प्रकरणात ईडीची नाशिकसह ११ ठिकाणी छापेमारी; मिरगाव...

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात ईडीची नाशिकसह ११ ठिकाणी छापेमारी; मिरगाव जवळील फार्म हाऊसवरही सर्च ऑपरेशन

नाशिक | Nashik

भोंदू अशोक खरातची (Ashok Kharat) एसआयटीकडून (SIT) कसून चौकशी सुरु असून, त्याच्या भोवती फास आवळला जात आहे. खरातला तिसर्‍या गुन्ह्यात सात दिवसांची म्हणजेच २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खरातवर आतापर्यंत लैंगिक अत्याचार, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे (Fraud) एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. यानंतर आता चौथ्या गुन्ह्यात (Forth Case) देखील त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे. एसआयटीने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज पहाटेपासून अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणांवर छापेमारी (Raid) केली आहे. यात नाशिक, पुणे आणि शिर्डी (Nashik, Pune and Shirdi) अशा एकूण ११ ठिकाणांचा समावेश असून,यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता पतसंस्थेचाही समावेश आहे. ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली असून, नाशिकमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. यामध्ये खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याचाही समावेश आहे.

हे देखील वाचा : ED Raid : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राहत्यातील एका ‘पतसंस्थेत’ ईडीची एन्ट्री; बोगस खात्यांद्वारे कोट्यवधींची अफरातफर?

दरम्यान, नाशिक पोलिसांनी (Nashik Police) केलेल्या तपासाच्या आधारे काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज ईडीने खरातशी संबंधित एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली. यात मिरगाव येथील ईशान्यश्वर मंदिराजवळ असलेल्या ब्रह्मानंद फार्म हाऊसवर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला. तर खरातशी संबधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात असल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्या

Narendra Modi : “नारी शक्ती वंदन विधेयकाला कुणी विरोध केला तर…”;...

0
नवी दिल्ली | New Delhi लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये (Lok Sabha and State Assemblies) महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ (Nari...