Thursday, June 4, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातचा गल्ली ते दिल्लीपर्यंत...

Ashok Kharat Crime News : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातचा गल्ली ते दिल्लीपर्यंत बोलबाला; डोक्यावर कुणाची ‘छत्रछाया’?

नाशिक | Nashik

स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलेला जाळ्यात ओढणाऱ्या अशोक एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याला एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) काल (बुधवारी) अटक केली. यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस (Police Custody) कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…

खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयात छापा टाकला असता या छाप्यात महत्त्वाचे पुरावे आणि ५८ धक्कादायक व्हिडीओ सापडले आहेत. याच कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात त्याचा धार्मिक विधीच्या नावाखाली एका महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सापडला. यानंतर तो व्हायरल झाल्यानंतर खरातचे ‘वासनाकांड’ उजेडात आले.

या हायप्रोफाईल बाबाचे राज्यात व परराज्यात असंख्य ‘भक्त’ असून त्याच्याविरोधात पूर्वी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी राज्यातील पोलीस ठाण्यांत होत्या. मात्र, त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी (Police Commissioner) हिंमत दाखवून खरातचा ‘खरा’ चेहरा जगासमोर आणून नाशिकच्या बालेकिल्ल्यातून जबरदस्त मास्ट्ररस्ट्रोक दिला आहे. अशातच आता अशोक खरातचे लागेबांधे थेट गल्ली ते दिल्लीपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्यावर नेमकी कुणाची ‘छत्रछाया’ आहे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेल; ‘चमत्कारी’ खरातचा पीडितेला धमकावून वारंवार अत्याचार

गल्ली ते दिल्लीपर्यंत बोलबाला

खरात याने अल्पावधितच अनेकांना आपल्या प्रभावाखाली ओढून भुरळ घातली. केंद्रासह राज्यातील काही नावाजलेले कॅबिनेट मंत्री, हरियाणा, राजस्थानासह अन्य राज्यातील मंत्री व भाजपासह महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांचे नेते, मंत्री हे देखिल बाबाच्या दरबाराचे पाईक आहेत. याच बळावर खरातने दिल्लीतही स्थान मिळविले. आता याच बाबाचा ‘बाबो’ झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता तपासात नेमके काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

​राजकीय वरदहस्त की फोटोबाजी?

​या प्रकरणानंतर मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा खरात याचे राज्यातील बड्या नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे -पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि तटकरे, यांच्यासोबतचे त्याचे फोटो समोर आल्याने हे नेते या भोंदूच्या आहारी गेले होते की खरातने स्वत:ची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला, अशी चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : शहरात दोन अलिशान बंगले, मिरगावला फार्म हाऊस तर पाथर्डीत ३० एकर…; वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी

समाजासाठी धोक्याची घंटा

​खरात प्रकरण हे केवळ एक गुन्हा नसून, अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या सुशिक्षित समाजाचे वास्तव आहे. ज्योतिष आणि विधीच्या नावाखाली जेव्हा एखादी व्यक्ती शरीराची मागणी करते किंवा गुंगी कारक औषधे देते, तेव्हाच सावध होणे गरजेचे आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ‘फास्ट ट्रॅक’वर करावा आणि या भोंदूला कठोर शिक्षा मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

‘आस्थेचा आभास की अंधश्रद्धेचा प्रभाव?’

शिवनिका संस्थानाशी संबंधित प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा ट्रस्टी म्हणून संबंध उघड झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल छायाचित्रांमध्ये त्या पतीसह कथित बाबा खरात याची पाद्यपूजा करताना आणि पावसापासून वाचवण्यासाठी छत्री धरून उभ्या असल्याचे दिसते. या प्रकारामुळे ‘प्रबोधन विरुद्ध प्रत्यक्ष वर्तन’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर कठोर कारवाईची मागणी करत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : वासनांध कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आणखी दोन गुन्हे दाखल, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

कोण आहे खरात?

संशयित अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान व ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो ‘मर्चंट नेव्ही’ या खासगी नोकरीतून निवृत्त आहे. मागील २० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात त्याने कार्यालय थाटले. ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो वावरु लागला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. भोंदूगिरी, भविष्यवाणी, स्वतःमध्ये दैवी अवतार असल्याचे भासवून त्याने अनेकांना ‘जाळ्यात’ ओढले आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना अचानक मिरगाव येथील मंदिरात भेट दिली होती.

हे देखील वाचा : कॅप्टनच्या अश्लील चाळ्यांप्रकरणी दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्री होते सतर्क, पुरावे हाती येताच पोलिसांनी खरातच्या ‘अशा’ आवळल्या मुसक्या


ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...