Friday, May 1, 2026
HomeनाशिकAshok Kharat News : विकृत खरातकडे ५८ नव्हे तर तब्बल 'एवढे' आक्षेपार्ह...

Ashok Kharat News : विकृत खरातकडे ५८ नव्हे तर तब्बल ‘एवढे’ आक्षेपार्ह Video; पोलीस प्रशासनही हादरले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैवीशक्तीचा बनाव, अघोरी मंत्र-तंत्राचा वापर आणि भविष्यातील संकटांची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या (Ashok Kharat) ‘पापाचा घडा’ आता भरला आहे. विशेष तपास पथकाच्या हाती खरातच्या कुकर्मांचे जे पुरावे लागले आहेत, ते पाहून पोलीस प्रशासनही हादरले आहे. सुरुवातीला ५८ व्हिडिओंचा संशय व्यक्त केला जात असताना, आता शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणातील खंडणी आणि व्हिडिओ प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवही पोलिसांना (Police) शरण आल्याने खरातच्या दुष्कृत्यांची ‘कुंडली’च उघड होणार आहे. याचे धागेदोरे थेट महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या नेत्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचले आहेत. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ आणि ‘सहयोग’ निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा आणि जादूटोणा करण्यासाठी या भोंदूचा वापर झाला का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : पोलिसांनी ‘सायकॉलॉजिकल गेम’ खेळला अन् कॅप्टन बरमुड्यावर बाहेर आला; ‘तृप्तबाला’ बंगल्यातून खरातला नेमकं कसं पकडलं?

नोव्हेंबर २०२५ मधील अमावस्येच्या रात्री केलेले अघोरी प्रकार आणि खरातचे ‘व्हीएसआर कनेक्शन’ (VSR) यामुळे हा तपास आता मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या भोंदूगिरीचा कळस म्हणजे एका अल्पवयीन मुलीवर त्याने केलेले अघोरी उपचार. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खरात एका ‘इंटरनेट केबल क्रिंपिंग टूल’चा वापर करून मुलीच्या पोटावर क्रिया करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तंत्र-मंत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या अश्लील प्रकारावेळी मुलीची आई समोरच बसलेली होती.

‘सहयोग’ अन् ‘देवगिरी’ वर जादूटोणा ?

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर खरातच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी केला आहे. १८ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान अघोरी पूजा करण्यात आल्याचे संशय आहे. या प्रकरणाचे ‘व्हीएसआर कनेक्शन’ तपासण्याची मागणी होत आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : खरातच्या साम्राज्यावर ठाकरे सरकारची ‘पाणी’ कृपा! शिवनिका संस्थानला दारणा समूहातून तब्बल ‘इतक्या’ लिटर पाण्याची मंजुरी; सिन्नरकर संतप्त

दादांच्या बंगल्यावर भोंदूची करणी? चाकणकरही अडचणीत!

पुणे येथील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक एकच्या समादेशक आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी एसआयटीची सूत्रे हाती घेताच खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. शुक्रवारी खरातचा स्वीय सहाय्यक नीरज जाधव याला शिर्डीतून नाशिकमध्ये आणून बेड्या ठोकण्यात आल्या. खरातच्या लॅपटॉपमधून सीसीटीव्ही फूटेज काढून, त्याचे व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योग हा नीरज करत होता, असा संशय आहे. खरातच्या घरातून दोन लॅपटॉप, ८ लाख रुपये, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

तपास पथकापुढील आव्हाने

  • जप्त १०० व्हिडिओमधील पीडितांचा ओळख पटवणे आणि त्यांना तक्रारीसाठी पुढे आणणे.
  • अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा?, खरातला ‘सुपारी’ देणारे राजकीय ‘राक्षस’ कोण, याचा शोध घेणे.
  • जप्त मालमत्तेची कागदपत्रे आणि मोठ्या रकमेचा स्त्रोत तपासणे.

मुद्दे

  • २९ डिसेंबर २०२५: वावी पोलिसांत खरातच्या फिर्यादीवरून दोघांवर खंडणीचा गुन्हा.
  • फेब्रुवारी २०२६: शिर्डी पोलिसांत मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी नीरज जाधववर गुन्हा.
  • १३ मार्च २०२६ : गृहविभागाकडून या प्रकरणासाठी ‘डखढ’ची नियुक्ती.
  • १७ मार्च २०२६: सरकारवाडा पोलिसांत पीडितेच्या तक्रारीवरून खरातवर बलात्काराचा गुन्हा.
  • २० मार्च २०२६: एसआयटीकडून मास्टरमाइंड नीरज जाधव याला अटक.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...