Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमCrime News : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक; एकाला अटक, दुसरा फरार

Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक; एकाला अटक, दुसरा फरार

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या भाविकाची व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयित आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली असून दुसरा फरार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंता सुरेश मेहंदळे (वय ४६, रा. नाशिक) हे त्यांच्या मित्रासह ११ एप्रिल रोजी दुपारी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी २०० रुपयांचा देणगी दर्शन पास घेतला होता. रांगेत उभे असताना संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याने त्यांना “१० मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो” असे सांगून संपर्क साधला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

यानंतर आरोपीने ३ हजार रुपयांत व्हीआयपी दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दुसरा संशयित आरोपी अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) याच्या मदतीने फिर्यादीला मंदिरात प्रवेश देऊन दर्शन घडवण्यात आले. दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर संशयित आरोपीने फिर्यादीकडून ३ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, देवस्थान ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत व्हीआयपी सेवा नसतानाही पावती न देता पैसे (Money) घेतल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘टॅब’ वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात ‘पार्ट-२’ टाळण्यासाठी पत्रकाराने खेळली रिस्की खेळी

दरम्यान, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (CCTNS) अन्वये गुन्हा क्रमांक ५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावीत हे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. तसेच या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘भाईगिरी’ एडिट करणं महागात; चार ‘रीलबाजांना’ गंगापूर पोलिसांनी दाखवल्या खाक्या

ताज्या बातम्या

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यस्तरीय समिती

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या...