Tuesday, October 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाले"; फडणवीसांचा रोष नेमका कुणावर?

Devendra Fadnavis : “लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाले”; फडणवीसांचा रोष नेमका कुणावर?

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपला (BJP) मोठा फटका बसला असून त्याची भर आता विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) काढण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याचे पक्षातील नेत्यांच्या फारच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. याबाबत आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलतांना लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका का बसला? याचे कारण सांगितले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : छत्रपती संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता; चिन्हही मिळाले

कोल्हापुरातील (Kolhapur) कणेरी मठ येथील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलत असतांना फडणवीस यांनी “देशात पुन्हा एकदा सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे.हे अनेकांना पहावत नाही. त्यामुळे हिंदू विरोधकांनी हिंदू विरोधी जागतिक वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ वोट जिहाद झाले (Vote Jihad) त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले, त्यामुळे संत शक्तीने हिंदू विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे”, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनंतर रोईंगपटू दत्तू भोकनळ सरकारविरोधात न्यायालयात जाणार; नेमकं कारण काय?

पुढे ते म्हणाले की, “धुळे लोकसभेला (Dhule Loksabha) सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी हरतो. निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून ४८ पैकी १४ मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले असल्याचे” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ३८ महत्वाचे निर्णय

तसेच “हिंदू (Hindu) समाजातील मुलींना फसवून नासवले जात आहे. एक लाखांपेक्षा जास्त घटना खोटं बोलून लग्न करून फसवणूक केल्याच्या आहेत, हा लव्ह जिहाद आहे. व्होट जिहाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदुत्व म्हणजे सहिष्णूता आहे, हिंदू समाजाला दिशा देणाऱ्यांनी आता समाजाला अजून जाग करायला हवे. कितीतरी हजारो वर्षांपूर्वी आमची संस्कृती आहे. आज देशामध्ये सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे सरकार आहे. आपण जसे संघटित होतं आहोत तस आपले विरोधी लोक संघटित होत आहेत. आपली लढाई सत्याची आहे, ही आता जिंकावीच लागेल याला आता आपल्या सर्वांची ताकद हवी असल्याचे” फडणवीस यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या