धुळे | प्रतिनिधी | Dhule
सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून बदनामी केल्याच्या मनस्तापातून धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी (Dhule Mayor Mayadevi Pardeshi) यांनी विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल (MLA Anup Aagrwal) यांनी दिली.
हे देखील वाचा : Dhule Accident News : राजस्थानमधील कोट्यात धुळ्याच्या प्रवासी वाहनाचा भीषण अपघात; ९ ठार, ६ जखमी
संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी सोशल मीडियावर महापौरांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या पोस्टमुळे झालेल्या बदनामीच्या मनस्तापातून महापौरांनी काल विषप्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांचे पती महादेव परदेशी यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले. महापौरांवर ४८ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Dhule Family Accident News : खाटूश्यामजीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; धुळ्यातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू
दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी संजय शर्मा (Sanjay Sharma) यांच्याविरोधात कालच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक (Arrested) केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात (Dhule City) खळबळ उडाली आहे.




