Thursday, June 18, 2026
Homeदेश विदेशअमेरिका इस्रायलसोबत संघर्ष सुरु असतानाच इराणवर नवं संकट; भूकंपाने हादरलं शहर

अमेरिका इस्रायलसोबत संघर्ष सुरु असतानाच इराणवर नवं संकट; भूकंपाने हादरलं शहर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इस्त्रायलबरोबर संघर्ष सुरु असताना दक्षिण इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेराश प्रदेशात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून तीव्र स्वरुपाचे हल्ले सुरु असतानाच भूकंपाच्या धक्क्यांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमधील ‘गेराश’ भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून तीव्र स्वरुपाचे हल्ले सुरुच आहेत. अमेरिका-इस्रायल लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत असताना भूकंपाचे धक्के जाणवल्याने इराणची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, तेहरानपासून ८०० किलोमीटरवर असलेल्या केरमान हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात किमान १३ इराणी सैनिक ठार झाल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.

- Advertisement -

ज्या गेराश भागात हा भूकंपाचे धक्के जाणवले, ते ठिकाण दक्षिण इराणमधील महत्वाचे ऊर्जा प्रकल्प, बंदर आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित आहे. विशेष म्हणजे, गचीन युरेनियम खाण या ठिकाणापासून साधारण १५०-१८० किलोमीटर अंतरावर आहे, जी इराणच्या युरेनियम स्त्रोतांपैकी एक महत्त्वाची खाण आहे.

Sonia Gandhi: “मौन हे ‘तटस्थ’ राहणे नसून…”; भारताच्या परराष्ट्र धोरणावर सोनिया गांधींची मोदींवर टीका

इराणचा ‘बुशहर’ हा अणुऊर्जा प्रकल्प देखील गेराशपासून २५०-३०० किलोमीटर अंतरावर नेऋत्तेला आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे अणुकेंद्रांचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्गाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मंगळवारी पहाटे गेराशजवळ झालेल्या या भूकंपाची यूएसजीएस डेटाने तीव्रता आणि खोली याची पुष्टी केली आहे. गेराश प्रदेशात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती या डेटातून देण्यात आली आहे. भूकंपाच्या केंद्रापासून जवळच्या भागात तीव्र हादरे जाणवले असले तरी, यामुळे मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.

“मी माझे मित्र नरेंद्र मोदींशी बोललो, भारताचे आभार मानतो”; नेतान्याहू-मोदींमध्ये संवाद, काय झाली दोघांमध्ये चर्चा?

गेराश दक्षिण इराणमधील फार्स प्रांतातील एक शहर आहे. गेराश काउंटीची राजधानी म्हणून ते प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र देखील त्याची ओळख आहे. २००६ च्या जनगणनेनुसार या शहराची २७,५०० पेक्षा जास्त लोकसंख्या नोंदवली होती. स्थलांतरामुळे येथील लोकसंख्येत वारंवार बदल होतो असे सांगितले जाते.

ताज्या बातम्या

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0
दिंडोरी | प्रतिनिधी जानोरी येथे ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (३१, रा. मुखेड, ता. निफाड)...