Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNana Patekar Death : नाना पाटेकरांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पुण्यातील डोणजे...

Nana Patekar Death : नाना पाटेकरांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पुण्यातील डोणजे गावात पार्थिव आणणार

पुणे | Pune

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (दि.०८ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात (Goa) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, पहाटे ५.२० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान आता नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील (Pune) त्यांच्या मुळगावी अंतिमसंस्कार होणार आहेत.नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील भोर तालुक्यातील डोणजे गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली आहे. नानांच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील डोणजे या गावामध्ये चालू झाली आहे.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी चित्रपटातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी घेतला आहे. त्याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : Nana Patekar Death : “अस्वस्थ वाटल्याने मित्राला मेसेज केला, रुग्णालयात नेत असतानाच..”; नाना पाटेकरांसोबत मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी सगळंच सांगितलं

मुलगा मल्हारला अश्रू अनावर

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मुलगा मल्हार हा कुटुंबासोबत पुण्यातील घरी होता. यानंतर तो तातडीने गोव्याकडे रवाना होऊन रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने डॉक्टर आणि कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी मल्हारला अश्रू अनावर झाले होते. नाना पाटेकरांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव पुण्यातील डोणजे गावात आणले जाईल आणि तेथे अंत्यसंस्कार केले जातील.

हे देखील वाचा : Nana Patekar Death : लहानवयात आर्थिक अडचणींचा सामना अन् ‘गमन’ ते ‘नटसम्राट’ अभिनयाचा बुलंद आवाज; असा होता नाना पाटेकरांचा संघर्षमय प्रवास

ताज्या बातम्या

Nana Patekar Death : नाना पाटेकर होते नाशिकचे जावई; नीलकांती हलदुले...

0
नाशिक | Nashik ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (दि.०८ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील...