Sunday, March 22, 2026
Homeदेश विदेशइस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजारींचा मुलासह मृत्यू; इराणचा इस्रायलला मोठा...

इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजारींचा मुलासह मृत्यू; इराणचा इस्रायलला मोठा इशारा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. काल (१७ मार्च) झालेल्या इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि त्यांचा मुलाचा मृत्यू झाला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने याला दुजोरा दिला. लारीजानी हे आपल्या मुलीच्या घरी होते. तेव्हा त्यांच्यावर हवाई हल्ला झाला आहे. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी लारीजानी यांच्या मुली घराच्या दुसऱ्या भागात होत्या, ज्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. मात्र, आपल्या डोळ्यादेखत वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याने त्या मोठा धक्क्याखाली आहेत. अली लारीजानी यांचा मुलगा वडिलांसोबतच महत्त्वाच्या चर्चेत होता, त्यावेळी झालेल्या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. इस्रायलने हा हल्ला इतक्या अचूकपणे केला की, केवळ लारीजानी यांचे सुरक्षित ठिकाण उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्तीचे नुकसान टाळले गेले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

“आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा…”; एकनाथ शिंदेंनी खासदारांचे कान टोचले

हल्ल्यानंतर इराणमध्ये संतापाची लाट
या हल्ल्यानंतर इराणच्या रस्त्यांवर निदर्शने सुरू झाली असून, इस्रायलविरुद्ध तात्काळ लष्करी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अली लारीजानी हे इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख असल्याने, त्यांच्या निधनामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाल्याची चर्चा आहे.

इस्रायलचा दावा
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी यापूर्वीच दावा केला होता की, त्यांच्या हवाई दलाने तेहरानजवळील एका गुप्त ठिकाणाला लक्ष्य करून लारीजानी यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात ‘बसीज मिलिशिया’चे कमांडर देखील मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

Israel-Iran Conflict : इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! मोजतबा खामेनेईंना ठार करण्याची इस्त्रायलची थेट धमकी; जागतिक तेल पुरवठा धोक्यात

कोण आहे अली लारीजानी
अली लारीजानी हे इराणचे एक अत्यंत प्रभावशाली नेते, तत्त्वज्ञानी आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या युद्धाच्या पहिल्याच केलेल्या इस्त्रायली आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यातील मृत्यूनंतर ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक म्हणून उदयास आले होते. इराणच्या राजकीय, लष्करी आणि सुरक्षा यंत्रणांमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अली लारीजानी यांचा जन्म 3 जून 1958 रोजी इराकमधील नजफ येथे इराणच्या अमोल शहरातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब इतके प्रभावशाली होते की 2009 मध्ये ‘टाईम’ मासिकाने त्यांना “इराणचे केनेडी” असे संबोधले होते. वडील एक प्रमुख धार्मिक अभ्यासक होते आणि त्यांच्या भावांनीही इराणच्या न्यायपालिकेत आणि इतर महत्त्वाच्या समित्यांवर उच्च पदे भूषवली आहेत.

या रक्ताचा बदला घेतला जाईल
या घटनेनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने कडक शब्दांत इशारा दिला आहे. “या रक्ताचा बदला घेतला जाईल आणि इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलने या ऑपरेशनवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांची लष्करी यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime News : बड्या धेंडांची भागीदारी; खरातच्या ‘मायाजाला’त प्रशासकीय...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वयंघोषिक कॅप्टन खरात (Ashok Kharat) याच्या नावे असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे एकामागून एक धक्कादायक पदर आता उलगडू लागले आहेत. केवळ जमीन...