Monday, April 20, 2026
HomeनाशिकNashik MLC Election : नाशिक विधान परिषदेचे वाजणार बिगुल; ७५ टक्के मतदारांच्या...

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेचे वाजणार बिगुल; ७५ टक्के मतदारांच्या उपलब्धतेमुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक | विजय गिते | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Nashik Local Body Election) आमदारकीची (MLA) जागा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रिक्त आहे. आता निवडणूक आयोगाने (Election Commission) ७५ टक्के मतदारांच्या उपलब्धतेचा निकष लावत या जागेसह राज्यातील १७ जागांवर निवडणूक घेण्याचे संकेत दिल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येणार आहे.

- Advertisement -

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मागील निवडणूक मे २०१८ मध्ये झाली होती. शिवसेनेचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला होता. मुख्य लढत ही प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झाली होती. शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना मैदानात उतरवले होते, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (तत्कालीन मविआ अस्तित्वात येण्यापूर्वी) उमेदवार शिवाजी सहाणे रिंगणात होते. २१ मे २०१८ रोजी मतदान झाले. नरेंद्र दराडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे नेतृत्व विधान परिषदेत केले होते.

हे देखील वाचा : Rain Update : उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; शहर जिल्ह्यात पावसाचा शिडकावा

जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहता, जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव, भगूर, चांदवड, ओझर आणि त्र्यंबकेश्वर यांसह एकूण ११ नगर परिषदांसाठी ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये महायुतीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. भाजप १००+, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ४५+, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३३+, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २६ इतर / अपक्ष १० जागा मिळविल्या आहेत.

आताची स्थिती काय?

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ७५ टक्के मतदार (ज्यामध्ये नगरपरिषद, नगरपालिका आणि काही जि. प. सदस्यांचा समावेश होतो) उपलब्ध असल्यास निवडणूक घेता येते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नसल्या तरी हा कोटा पूर्ण होत असल्याने लवकरच येथे आचारसंहिता लागू होऊ शकते.

मुदत संपली, निवडणूक लांबली

नरेंद्र दराडे यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ मे २०२४ मध्येच संपला आहे. वास्तविक पाहता, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका वेळेवर झाल्या असत्या, तर ही निवडणूक २०२४ च्या सुरुवातीलाच होणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने आणि लोकप्रतिनिधी (नगरसेवक/जि.प. सदस्य) नसल्याने ही निवडणूक रखडली होती.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी

शिंदे गटाचा प्रभाव, मविआला फटका

जिल्ह्यातील ११ पैकी ५ नगरपरिषदांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले असून, हा गट जिल्ह्यात सर्वात मोठा ठरला आहे. येवला (छगन भुजबळ) आणि सिन्नर (माणिकराव कोकाटे) यांसारख्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपले गड राखले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दिसून येते. विशेषतः ग्रामीण भागातील नगरपरिषदांमध्ये महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे. या नवनिर्वाचित नगरसेवकांमुळेच विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेला ७५ टक्के मतदारांचा कोटा आता पूर्ण झाला आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या १७ जागांचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बंदुकीच्या धाकावर संसार; पतीने पत्नीला पळवले

ताज्या बातम्या

Accident News : दोन भीषण अपघातात युवकाचा जागीच तर महिलेचा उपचारादरम्यान...

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi तालुक्यात रविवारी (दि.19) घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये (Accident) एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात...