मुंबई | प्रतिनिधी Mumbai
महाविकास आघाडीत राजकीय भवितव्य नसल्याच्या भावनेतून आघाडीचे खासदार आणि आमदार अस्वस्थ असून यातील अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. बावनकुळे यांच्या या दाव्यामुळे भाजप महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ राबविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या या दाव्यामुळे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आमच्या पक्षांचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून आम्हाला पक्षांकडून पाठबळ मिळत नाही. मतदारसंघातील परिस्थितीविषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी आमच्या संपर्कात असलेल्या आघाडीच्या आमदारांच्या आणि खासदारांच्या आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भात प्रश्न विचारला असता, तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो, हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर त्यांचे स्वागत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
भाजपच्या या दाव्यामुळे आघाडीतील विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाविषयी संशयाने पाहिले जात आहे. पवार गटाचे विधानसभेतील काही आमदारांना भाजपमध्ये घेऊन विधानसभेत स्वबळावर साधे बहुमत प्राप्त करण्याचा आणि त्याचवेळी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्याचा भाजपचा हेतू असल्याची चर्चा आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १३२ आमदार असून जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी युवा पक्ष आणि एक अपक्ष आमदाराच्या पाठबळामुळे भाजपचे संख्याबळ १३७ वर पोहचले आहे. त्यामुळे भाजपला विधानसभेतील १४५ चा आकडा गाठण्यासाठी फक्त आठ आमदारांची गरज आहे. ही गरज शरद पवार गटाच्या आमदारांच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दीड कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त
दरम्यान, मारकडवाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची आणि खालच्या पातळीवर टीका करणे आमच्या पक्षाला मान्य नाही. शरद पवार यांच्याबद्दल बोलणे पक्षाला मान्य नाही. आम्ही या टीकेची दखल घेतली असून त्यांना पक्षाकडून समज दिली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून समन्वयाने योग्य निर्णय घेईल. आम्ही जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याला आमचे सध्या प्राधान्य असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना बावनकुळे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची रचनाच पक्ष फोडाफोडीतून झाली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावे? आता आमदार फोडणे सोपे झाले आहे. कारण घटनेतील अनुसूची १० धाब्यावर बसवून काम सुरु आहे. विधासनभेतील २३० आमदार सांभाळताना महायुतीच्या नाकीनऊ आले असताना अशी विधाने करून त्यात आमची भर घालण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी उपहासात्मक टीका पाटील यांनी केली.