Saturday, April 4, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : खरातची 'शस्त्र कुंडली' उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब

Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब

तत्कालीन जिल्हाधिकारी, एसपी संशयाच्या फेऱ्यात !

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली खरात आहे. खरातला २०१२ मध्ये मंजूर झालेला आणि आता चौकशीनंतर निलंबित करण्यात आलेला पिस्तूल (Pistol) परवाना अत्यंत संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातकडे तब्बल १२ वर्षांपासून शस्त्र असतानाही नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा स्थानिक वावी पोलीस ठाण्याच्या (Wavi Police Station) दप्तरी याची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : खरातच्या ‘कुकर्मा’ मागे राजकीय वरदहस्त? रुपाली चाकणकरांवर ‘सेटलमेंटचा’ आरोप!

या प्रकरणामुळे नाशिकच्या प्रशासकीय आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई वळली आहे. अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असलेला शस्त्र परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिफारस करून पाठवला गेला, हा आता कळीचा प्रश्न ठरत आहे. २०१२ मधील तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासू, विलास पाटील, पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पडवळ आणि वावी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रमुखांची भूमिका आता चौकशीच्या फेऱ्यात आली आहे.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार; SIT कडून कोठडीची मुदत वाढवून मागितली जाणार?

नियमांना बगल देऊन हा परवाना मॅनेज केला गेला का? अशी चर्चा आता रंगली आहे. खरातने जानेवारी २०२४ मध्ये या परवान्याचे नूतनीकरणही करून घेतले होते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनडीएल या आणि एएल आयएस ऑनलाईन प्रणालीमध्ये याची नोंद अनिवार्य असतानाही ती का आढळली नाही, याचा शोध आता एसआयटी (SIT) घेणार आहे. ज्या परवान्याला यूआयएन नसतो, तो अवैध मानला जातो. खरातच्या बाबतीत याच तांत्रिक नोंदींची वस्तुस्थिती तपासली जात आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने पोलिसांनी सखोल चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर केला आहे. खरात सध्या जेलमध्ये असल्याने त्याला तिथेच कारण दाखवा नोटीस बजावण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा परवाना आता कायमस्वरुपी रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

सध्या हा अग्निशस्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. तो कायमस्वरुपी रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत संबंधित शस्त्रधारकाला नोटीस बजावली आहे. खरात पोलीस कोठडीत असल्याने विशेष तपास पथकामार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime : भोंदू खरातचा बँकिंग ‘विळखा’; १०० संशयास्पद खाती,...

0
शिर्डी | Shirdi भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचली असून, राहाता (Rahata) येथील समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या...